विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव दिल्यास विद्यार्थी यशाच्या शिखरावर उत्तुंग भरारी घेतात – अँड. संदीप सुरेश पाटील
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात विविध उपक्रमांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेत उत्कृष्ट हिंदी वैचारिक लेख स्पर्धेत द्वितीय वर्ष बीसीए वर्गाची विद्यार्थिनी निकिता सुनील धनगर हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये 1000/- व प्रमाणपत्र प्राप्त केले तर उत्कृष्ट इंग्रजी वैचारिक लेख स्पर्धेत एम. ए. इंग्रजी द्वितीय वर्ष वर्गाचा विद्यार्थी धीरज दिनकर बाविस्कर याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 750/- व प्रमाणपत्र प्राप्त करून यश संपादन केले. तसेच चेतन पवार या विद्यार्थ्याने चोपडा मतदार संघाचे प्रति आमदार पद पटकावले त्याबद्दल अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिकांची माहिती व पारितोषिकाचे वाचन शरभंग नियतकालिकाचे संपादक डॉ. एम. एल. भुसारे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. डी. डी. कर्दपवार यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ.ए. बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार श्री. डी. एम. पाटील, डॉ. डी. पी. सपकाळे, डॉ. एम. एल. भुसारे, डॉ. डी. एस. पाटील, डॉ. डी. डी. कर्द पवार, डॉ. ए. एच. साळुंखे व चेतन बाविस्कर आदि उपस्थित होते.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) उपक्रमांतर्गत नुकत्याच पार पडलेल्या निवड प्रक्रियेत महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचा विद्यार्थी चि. चेतन पवार याने घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची महाविद्यालयातून ‘अध्यक्ष’ म्हणून आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातून ‘यिन प्रतिआमदार’ म्हणून अधिकृत निवड झाली आहे. तसेच विद्यापीठाच्या नियतकालिक अंक स्पर्धेत निकिता धनगर व धीरज बाविस्कर यांनी प्राप्त केलेल्या या गौरवशाली यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी त्याचा विशेष सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
‘यिन’च्या माध्यमातून तरुणांना नेतृत्वाची आणि राजकीय प्रक्रियेची माहिती मिळण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ दिले जाते. याअंतर्गत राज्यभरात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रतिआमदारांची निवड केली जाते. महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला होता. यात उत्कृष्ट कामगिरी करत चि. चेतन पवार याने चोपडा मतदारसंघाचे ‘प्रतिआमदार’ पद पटकावले. या निवडीमुळे तो आता लवकरच मुंबई येथे होणाऱ्या ‘यिन’च्या राज्यस्तरीय अधिवेशनात चोपडा मतदारसंघातील तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे.
यावेळी वार्षिक नियतकालिक अंक स्पर्धेत धीरज बाविस्कर व निकिता धनगर यांनी मिळविलेल्या त्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील यांनी त्याला सन्मानित केले. यावेळी बोलताना त्यांनी चेतन पवारच्या नेतृत्वगुणांचे व निकिता धनगर आणि धीरज बाविस्कर यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक केले.

















