कोरोणात चार मुलींचे आधारस्तंभ हरपलेले कै. माजी सैनिक भागवत पाटिल यांचा मुलीने स्वताच्या लग्नात पप्पांचा टॕच्यू बनवूण घेतला आशीर्वाद

कोरोणात चार मुलींचे आधारस्तंभ हरपलेले कै. माजी सैनिक भागवत पाटिल यांचा मुलीने स्वताच्या लग्नात पप्पांचा टॕच्यू बनवूण घेतला आशीर्वाद

(आदर्श बातमी)नांद्रा ता.पाचोरा((वार्ताहार) पापा की लाडली बेटिया असे म्हटले जाते व मुली ही तशाच प्रेमाने वडिलांना वर प्रेम करत असतात मागील कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत होत्याच नव्हते होऊन अनेक कुटूंबाचे कुटूंब घरचा आपला कर्ता पुरुष गेल्याने उध्वस्त झालेत अशाच प्रकारे नांद्रा येथे ही अनेक चांगले चांगले व्यक्तिमत्त्व अचानक हरपले त्या मध्येच नांद्रा येथील चार मुलींचे एकटे खंबीर आधारस्तंभ असणारे (मुलगा नाही),सदाचारी व नेहमी हसतमुख व्यक्तिमत्त्व माजी सैनिक भागवत पाटिल यांचे अनपेक्षित कोरोणात निधन झाले त्यांना चार मुलीं पैकी दोनच मुलींचे लग्न झालेले व दोन मुलींचे लग्न बाकी असताना,त्या कुटूंबावर मोठा आघात झाला व या कुटूंबावर नियतीने क्रूर आसा अन्याय केला.अशा भयान परिस्थितीत त्यांच्या पत्नी शाॕक झाल्या.त्यावेळेस त्यांना त्यांचे दोहो जवाई जे आर्मी व इंजानियर आहेत त्यांनी घरातीलमा मुलाची जवाबदारी पेलून त्या कुटूंबाला कसेतरी सावरले व आज कै.भागवतफौजी यांच्या तिसऱ्या मुलीचे लग्न,पप्पांना मोठ्या थाटामाटात करायचे होते पण ते स्वप्न ते उराशीच घेऊन ते अचानक या कुटूंबातून निघून गेल्याने त्यांची स्मृती कायम मुलींना आपल्या घरात दरवडावी व पप्पा आपल्यातच असल्याची जाणिव व्हावी म्हणून त्यांचा मोठा सिल्व्हर चेअर वरचा सुमारे दोन लाख किंमतीचा टॕच्यू(पुतळा) बनवून लग्नात त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेतला व त्यांना डबडबल्या पाणावलेल्या डोळ्ंयानी श्रद्धाःजली अर्पण करुन पप्पा त्यांच्या सोबतच असल्याची जाणिव करुन घेतली.याप्रसंगी आलेले सर्व नातेवाईक ,वर्हाडी यांचे डोळे ही पाणावूण , खरच पापा च्या लाडल्या मुलीच असतात व मुलींचे पप्पावरचे हे सर्व प्रेम पाहून सर्वांना गहिवरुन आले.