पाचोरा येथील संभाजीनगर मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष

पाचोरा येथील संभाजीनगर मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष

( पाचोरा प्रतिनिधी )पाचोरा येथील उल्हास टॉकीज मागील संभाजीनगर भागात राहत असलेले रहिवासी श्री अनिल पवार यांच्या घराजवळ व शिंपी मंगल कार्यालय परिसर जवळील यांच्या घराजवळील गटरी काढल्या जात नाहीत तसेच काही ठिकाणी त्या तुडुंब भरलेल्या असून त्या रस्त्याचे काम झाल्यामुळे त्यांची संपूर्ण दगडाची घाण गटरी मध्ये गेल्यामुळे गटार बंद झाली असून पावसाळा सुरू झाला असून गटारीचे पाणी घरात जाण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन काम मार्गी लावावे अन्यथा त्या परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत राहतील ही विनंती.