तहसीलदार सह वाहन चालक व पंटर ला अटक जळगांव अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई

तहसीलदार सह वाहन चालक व पंटर ला अटक जळगांव अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई
१) योगेश्वर नागनाथराव टोंपे, वय-32 व्यवसाय-नोकरी, तहसिलदार, तहसिल कार्यालय, बोदवड ता.बोदवड जि.जळगाव.
रा.केअर ऑफ के.जे. पाटील संताजी नगर, मु.नगर पोस्टे रोड, मुक्ताईनगर मुळ रा.शिवकृपा निवास, शारदा नगर, देगलूर, जि. नांदेड (वर्ग -1)
२) अनिल रावजी पाटील, वय-51 व्यवसाय -नोकरी तहसिलदार यांचे शासकीय वाहनावरील चालक, तहसिल कार्यालय, बोदवड
रा.चिखली ता.बोदवड जि.जळगाव
*(वर्ग 3) मंगेश वासुदेव पारिसे, -31 व्यवसाय-नोकरी तलाठी बोदवड
रा.राजा चंद्रकांत सोसायटी बोदवड ता.बोदवड जि.जळगाव (वर्ग 3) शरद समाधान जगताप, वय-25
व्यवसाय-मजुरी (खाजगी पंटर)
रा.रूप नगर, बोदवड .ता.बोदवड जि.जळगाव.
लाचेची मागणी- आरोपी क्रं.1 व 2 यांनी स्वतःसाठी प्रथम 10,000/-रू. व तडजोडीअंती 5,000/-रुपये आरोपी क्रं.3 यांनी स्वतःसाठी दरमहा 3,000/- रुपये लाचेची मागणी.

तक्रारदार यांचे वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन त्यांचे वाळू वाहतुक करणारे ढंपर दि.26/03/2022 रोजी तहसिलदार बोदवड यांनी बोदवड तालुका हदीतील सिंधी ते सुरवाडे गावाच्या दरम्यान रात्री थांबवले व सदर ठिकाणी तहसिलदार हे वाहनात बसलेले असतांना त्यांचा चालक व सोबत असलेला त्यांचा खाजगी पंटर यांनी नियमीत हप्त्याचे 23,000/- रुपये जागेवरच घेतले व सदर गाडी सोडण्यासाठी 10,000/-रुपयांची लाचेची मागणी केली तसेच बोदवड तलाठी मंगेश पारीसे यांनी सुध्दा डंपरने वाळू वाहतुक करू देणेसाठी मासिक 3000 लाच रकमेची मागणी केली त्यावरुन दि.30/03/2022 तहसिल कार्यालय बोदवड येथे पडताळणी केली असता दि.26/03/2022 रोजी रात्री अडविलेले वाळूचे ढंपर सोडल्याच्या मोबदल्यात आरोपी कं.1 व 2 यांनी प्रथम 10,000/-रु व तडजोडीअंती 5,000/-रुपयांची लाचेची मागणी केली तसेच तलाठी बोदवड यांनी सदरचे ढंपर बोदवड हदीत चालु ठेवण्याच्या मोबदल्यात 3,000/- रु असे आरोपी क्रं.1 व 2 यांनी 5,000/- रुपये व आरोपी क्रं.3 यांनी स्वतःसाठी 3,000/- रुपये तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष मागणी करून आरोपी क्रं.1, 2 व 3 यांचे सांगणेवरून आरोपी क्रं.4 यांनी सदरची रक्कम आरोपी क्रं.1,2,3 यांचेसाठी व स्वतःसाठी स्विकारली.श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.