Home महाराष्ट्र वडुले खुर्द येथे चार पिढ्या पासून चालत आलेला खंडोबा माळावरील चैत्र पौर्णिमा...

वडुले खुर्द येथे चार पिढ्या पासून चालत आलेला खंडोबा माळावरील चैत्र पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न 

वडुले खुर्द येथे चार पिढ्या पासून चालत आलेला खंडोबा माळावरील चैत्र पौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा आणि कोल्हापूर चा ज्योतिबा या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला मोठा महोत्सव साजरा करण्यात येतो. खंडोबा भक्तांनी आपल्या सोयीनुसार अनेक ठिकाणी खंडोबा मंदिरे उभारली आहेत.त्याच प्रमाणे अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे ही कान्होबा माळ परीसरात रस्त्यावर फार पुरातन काळापासून पुर्वजांनी छोटे मंदिर बांधलेले आहे.या ठिकाणी फार पूर्वीपासून चैत्र पौर्णिमेला मोठा महोत्सव साजरा करण्यात येतो. चार पिढ्या पासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे.खंडोबा माळावरील महोत्सव यंदा ही चैत्र पौर्णिमेला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.फार पुर्वी पासुन गीते आणि खाडे परीवार ही परंपरा चालवत आहेत.चैत्र पौर्णिमेच्या‌ दिवशी पैठणहुन कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने माळावरील खंडोबाचा जलाभिषेक करण्यात आला. पितळेच्या घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबा देवाच्या मुर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.नंतर महानैवेद्य अर्पण करून महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले होते.वडुले खुर्द येथिल जयमल्हार जागरण गोंधळ पार्टीच्या वतीने रात्रभर जागर आयोजित करण्यात आला होता.त्यांना कोपरे येथिल बाबीर भक्त पोपटराव उघडे आणि शंकरराव उघडे यांनी विशेष सहकार्य केले.तोफांच्या आवाजात जागराला सुरुवात करण्यात आली.या उपक्रमासाठी वडुले,वाघोली, कोपरे,दिंडे वाडी, चव्हाण वाडी येथिल भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.खंडोबा भक्त कान्हू श्रीमंत गीते हे आजपर्यंत ही परंपरा चालवत आहेत.आता त्यांची चौथी पिढी ही परंपरा पुढे चालवत आहेत.लवकरच या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने घेण्यात आला आहे. या मंदिराच्या भोवती सभामंडपा साठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विषेश सहकार्याने आणि पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अभय काका आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली विषेश प्रयत्न केले जाणार आहेत. कारभारी गीते, ज्ञानदेव गिते, मल्हारी गीते, मारुती गीते अंबादास खाडे, लिंबाजी खाडे, संभाजी खाडे हे या कामासाठी विषेश प्रयत्नशील आहेत.

Don`t copy text!