पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नछत्र योजना सुरू

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नछत्र योजना सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा व देवेन हॉटेल यांच्या सौजन्याने याने बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी कामगार यांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अन्नछत्र योजना अल्पदरात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे .25 रुपयात एक भाजी ,तीन पोळ्या किंवा पाच पुरी. अशा या योजनेचे स्वरूप आहे यामध्ये शेतकरी बांधवांना बाहेर लागणारा जेवणाचा खर्च अल्पदरात अन्नछत्र म्हणून बाजार समितीने सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून कामगार सुद्धा आनंदी आहेत आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ मुख्य प्रशासक बाजार समिती सर्व प्रशासकीय संचालक रणजीत पाटील , चंद्रकांत धनवडे, प्रा. एस डी पाटील , प्रवक्ते खलील देशमुख, नाना देवरे,यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यासाठी भगवान मिस्तरी सहकार्य लाभत आहे यावेळी बाजार समिती सचिव बी.बी.बोरुडे, उपसचिव .प्रतिक ब्राम्हणे,नगरसेवक विकास पाटील तालुका अध्यक्ष , माजी, नगरसेवक भूषण वाघ रोहित वाणी, लिपिक बालवीर सिंग शीख व रोहित देशमुख व्यापारी- सुभाष अग्रवाल उपस्थित होते
तरी शेतकऱ्यांनी, व्यापारी बांधवांनी , हमाल, मापाडी कामगार यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे करण्यात येत आहे.