संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचे कट कारस्थान रचणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना मराठा समाजाचे साकडे
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे हृदय सम्राट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचे कट कारस्थान रचल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.जालना जिल्ह्यातील पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली आहे. या कट कारस्थानाचा मुख्य सुत्रधार “आका” याला पोलिसांनी ताब्यात घ्यावे आणि या हत्येच्या कट कारस्थानाची विषेश पोलिस पथक नेमून निःपक्ष व पारदर्शक चौकशी आणि तपास करावा अशी मागणी “अखंड मराठा” समाजाने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आणि संवेदनशील स्वरुपाचा असुन सर्व सामान्य जनतेच्या मनात या विषयी संतापाची लाट निर्माण झालेली आहे.जरांगे पाटील यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पोलिस खात्या मार्फत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी अशीही मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.अपघात दाखवून जीवे मारण्याचे कट कारस्थान म्हणजे तमाम मराठी जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा डाव आहे.जरांगे पाटील म्हणजे तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेची अस्मिता आहे.आणि त्या अस्मितेला धक्का पोहोचला तर संपूर्ण राज्यभर आगडोंब उसळल्या शिवाय राहणार नाही. यामुळे पोलिस खात्याने वेळीच सतर्क राहून जरांगे पाटलांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.या निवेदना वर ॲडव्होकेट अनुराधा येवले,मिनाक्षीताई वागस्कर, कांताबाई बोठे,भारत भोसले,रमेश मुंगसे,श्रीपाद दगडे,गुंजाळ साहेब,रत्नाकर दरेकर,दिलिप कोल्हे,अशोक पवार,प्रमोद कोरडे,वैभव भोगाडे,गणेश नाईकनवरे,अभय शेंडगे,मिलिंद जपे, परमेश्वर पाटील,मदन आव्हाड यांच्या सह्या आहेत.या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाचा नेमका पोलिस कसा तपास करतात आणि संशयित आरोपी विरोधात काय कारवाई करतात याकडे राज्यातील तमाम मराठी माणसाचे लक्ष लागले आहे.






















