श्री. कृष्णराव साळुंखे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

श्री. कृष्णराव साळुंखे यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

पाचोरा- पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था,पाचोरा संचलित, श्री.एच.बी.संघवी हायस्कूल,खेडगाव (नंदीचे) येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री कृष्णराव आत्माराम साळुंखे यांना “महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 13 वी राष्ट्रीय परिषद सावंतवाडी-कोकण, जि – सिंधुदुर्ग येथील नगरपालिका नाट्यगृहात दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी संपन्न झाली. या परिषदेतील विशेष सोहळ्यामध्ये माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते श्री. कृष्णराव साळुंखे व सौ. वैभवी साळुंखे यांना सहपरिवार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.
सदर कार्यक्रमातच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री.व्यंकटराव जाधव यांच्याकडून पाचोरा तालुकाध्यक्ष पदी श्री.कृष्णराव साळुंखे यांची नियुक्ती देखील केली गेली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीपभाऊ वाघ, चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासो श्री. व्ही. टी. जोशी, सचिव ॲड.श्री.महेशदादा देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत नागणे, पर्यवेक्षक श्री.आर. बी. पाटील, संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच या परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.डॉ.पंकज शिंदे व सर्व मित्र परिवाराने अभिनंदन केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजी शिंदे, जिल्हासचिव प्रवीण मोरे, गजेंद्र कानडे (दोंडाईचा) सौ. कुंदा पाटील, चंद्रकांत पाटील,भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, स्वप्निल बागुल, प्रा.डॉ.गिरीश पाटील (नाशिक), सतीश संदानशिव, स्वाती पाटील, कुमुदिनी पाटील, श्रद्धा अहिरराव, ज्योती संदानशिव आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.