मराठी ही अभिजात भाषा व्हायला हवी – डॉ. अतुल देशमुख

मराठी ही अभिजात भाषा व्हायला हवी – डॉ. अतुल देशमुख

पाचोरा दि. 2 – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय, भडगाव येथील मराठी विभागप्रमुख मा. डॉ. अतुल देशमुख यांचे *…’तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी सर्वोत्तम’* या विषयावर दि. 27 फेब्रुवारी 2022, रविवार रोजी कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवसा’निमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानात त्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. कुसुमाग्रजांच्या साहित्यातून आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ हे पैलू नववाचकांनी अंगीकारले पाहिजेत, असे आवाहन केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी सर्वोत्तम’ हा मराठीचा केलेला गौरव मराठी भाषकांना आणि साहित्यिकांना प्रेरणादायी ठरणार आहे असे सांगितले. त्यांनी मराठीच्या जन्मापासून तर आजपर्यंतच्या साहित्याचा प्रवास यावर प्रकाश टाकून मराठीच्या प्रगतीचा इतिहास मांडला. मराठीच्या अस्तित्वाविषयी काळजी करण्याची गरज नाही. कारण तिचे अस्तित्व अबाधित राहील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हायला हवा. त्यामुळे तिच्यात अनेक संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी व्याख्यानाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख मा. प्रो. डॉ. वासुदेव वले यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन करून त्यातील सामाजिक दृष्टिकोन आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यावेळी भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एन. एन. गायकवाड, प्रा. एस. आर. ठाकरे, डॉ. डी. एम. मराठे, डॉ. एस. जी. शेलार, डॉ. डी. एच. तांदळे, प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. वाय. बी. पुरी, डॉ. एस. एन. हडोळतीकर, डॉ. श्रीमती क्रांती सोनवणे, डॉ. श्रीमती स्वाती महाजन, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. श्रीमती प्राजक्ता देशमुख, प्रा. श्रीमती सुवर्णा पाटील, प्रा. गणेश देशमुख, प्रा. नितीन पाटील, प्रा. सुनील पाटील, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.