पाचोरा येथे शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपा महिला आघाडीची मागणी

पाचोरा येथे शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपा महिला आघाडीची मागणी

पाचोरा-

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दि. २६ मे २०२२ रोजी व्हिडिओद्वारे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी अर्वाच्च शब्दात वक्तव्य केले होते.या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत असल्याने भारताचे नागरिक म्हणून आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे यावेळी भाजपा महिला आघाडी पाचोरा पदाधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानां विषयी असे बदनामीकारक विधान करणे हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे तरी दीपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य अतिशय गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर पद्धतीने गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मा. प्रांताधिकारी पाचोरा व पोलीस निरीक्षक पाचोरा यांना पाचोरा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ साधना देशमुख शहराध्यक्ष ज्योती चौधरी,उषाताई पाटील, सुरेखा कोळी,कल्पना तडवी प्रिया कोळी,सखुबाई पाटील व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.