लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे उन्हाळी बाल संस्कार शिबिर आनंदात संपन्न

लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे उन्हाळी बाल संस्कार शिबिर आनंदात संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा शहरात गेल्या अकरा दिवसांपासून चालू असलेल्या उन्हाळी बाल संस्कार शिबिराचा आज समारोप झाला गेल्या अकरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना अध्यात्मिक सामाजिक व तसेच बौद्धिक मार्गदर्शन करण्यात आले सकाळी उठल्यापासून योगासने गीता पाठ हनुमान चालीसा रामरक्षा विष्णुसहस्त्रनाम हरिपाठ ज्ञानेश्वरी गायन पखवाज वादन आधी करून विषयांचं मार्गदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना समाजात कसे वागावे संस्कारशील जीवन कसे असावे व माता-पित्यांचा आदर तसेच थोरामोठ्यांचा आदर कसा राखावा हे शिकविण्यात आले समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी अकरा दिवसात प्राप्त केलेल्या गुणांचे प्रकटीकरण केले ज्यात हनुमान चालीसा गीतेचे श्लोक गवळणी भजन म्हणून दाखवली आलेल्या सर्व मान्यवर यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले
शिबिराचे आयोजन पाचोरा शहरात असणाऱ्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था जे गेल्या तीन वर्षापासून गरीब अनाथ मुलांसाठी काम करत आहेत आणि वर्षभर वारकरी शिक्षण धार्मिक शिक्षण यासह शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहे याच संस्थेने जे मुलं वर्षभर राहू शकत नाही अशा मुलांसाठी हे शिबिराचे आयोजन केले होते
यात संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता ताई पाटील व त्यांचे पती भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर तसेच संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय रमेश जी मोरे यांनी केले होते शिबिरासाठी गावातील अनेक सामाजिक क्षेत्रातील लोकांचे सहकार्य लाभले त्यात अन्नदान असो की अजून काही लागणारी मदत ही मिळाली
शिबिर संपन्न होत असताना सहभागी अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले शिबिरार्थींना जाताना प्रमाणपत्र तसेच एक वॉटर बॅग आदरणीय रमेश जी मोर यांच्याकडून भेट म्हणून देण्यात आले शिबिर हे निशुल्क होते फक्त सेवा हा भाऊ मनात ठेवून शिबिराचे आयोजन केले होते म्हणून शिबिरामध्ये जवळजवळ दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असेच शिबिर भविष्यात देखील पाचोरा शहरामध्ये उन्हाळी हिवाळी अशा दोन टप्प्यांमध्ये होतील असे आवाहन आदरणीय रमेश जी मोर कथा भागवताचार्य योगी जी महाराज व सुनीताताई पाटील यांनी केली