श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती जगाने शिकण्यासारखी – प्रा.लिलाधर पाटील

श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती जगाने शिकण्यासारखी – प्रा.लिलाधर पाटील

पाचोरा दि. 02 – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने धनदाईमाता महाविद्यालय, अमळनेर येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते व इंग्रजी विभागप्रमुख मा. प्रा. लिलाधर पाटील यांचे *’अनल्पधी छत्रपती शिवाजी महाराज’* या विषयावर दि. 22 फेब्रुवारी 2022, मंगळवार रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाद्वारे त्यांनी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास जगातल्या राजा-महाराजांनी नंतरच्या काळात करून अनेक युद्ध जिंकली असे प्रतिपादन केले. त्याही पुढे त्यांनी सांगितले की, भारताचा तत्कालीन बादशहा औरंगजेबला महाराजांच्या याच बुद्धी कौशल्याच्या नीतीने पराजित केले. अफजल खानासारख्या शूर सेनापतीलाही बुद्धी कौशल्याच्या जोरावर धारातीर्थ केले. ही युद्धनीती महाराजांकडून संपूर्ण जगाने शिकण्यासारखी आहे. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता, निपुण युद्धनीती, संघटन कौशल्य, दूर दृष्टिकोन, शेतीनिष्ठा, जगाच्या पोशिंद्याविषयी जिव्हाळा अशा अनेक मूल्यांची शिकवण श्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला दिली. *’अनल्पधी’* या शब्दाचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, चाणाक्ष आणि बुद्धिचातुर्याने पारंगत असलेला राजा म्हणजेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे श्री. छत्रपती शिवाजी महाराज व सेनापती अफजल खान यांच्या युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर ठेवला त्यांनी पुढे असेही प्रतिपादन केले की, श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची लढाई ही धार्मिक नसून ती राजकीय होती, असेही स्पष्ट केले. आज महाराजांचे संस्कार नवतरुण पिढीमध्ये रुजवण्याची गरज आहे असे प्रतिपादन देखील केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. पी. बी. सोनवणे, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. पी आर. सोनवणे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, प्रा. माणिक पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. श्रीमती क्रांती सोनवणे, डॉ. बालाजी पाटील, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश देशमुख, प्रा. श्रीमती इंदिरा लोखंडे, प्रा. सुनील पाटील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. के. एस. इंगळे यांनी केले.