श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज रोजी वय वर्ष 12ते15 गटातील सातवीच्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित
श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज दिनांक 28 मार्च सोमवार रोजी वय वर्ष 12ते15 गटातील सातवीच्या विद्यार्थ्यांचे करोना प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले.

पाचोरा (प्रतिनिधी) श्री गो. से .हायस्कूल. पाचोरा येथे आज दिनांक28 मार्च रोजी 12ते 18 या वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण देण्यात आले. रोजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित. होते यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, ए. बी .अहिरे. एन. आर .पाटील. यांच्या उपस्थितीत व आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेविका भारती पाटील ,मनीषा गढरी, आशा सेविका मनिषा अहिरे, वैशाली महाजन यांनी विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंसिंग ठेवून लसीकरण करून घेतले यावेळी 175 मुला-मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक शितल महाजन, प्रतिभा पाटील, वैशाली कुमावत, प्रीतम सिंग पाटील, अरुण कुमावत वर्गशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीने लसीकरण करून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.