श्री सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

✨⛳📿शिवजयंती📿 ⛳ ✨ ज्या समाजाचा इतिहास बलशाली असतो त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते.आपल्या देशाच्या इतिहासातील सोनेरी पान असणाऱ्या प्रजाहित दक्ष राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज,श्रीमंतयोगी,बहुजन प्रतिपालक,महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.जयश्री पाटील मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर,पालक प्रतिनिधी श्री. विठ्ठल महाजन, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.लक्ष्‍माबाई सोनवणे,श्रीमती. उज्वला साळुंखे मॅडम, श्रीमती.रुपाली पाटील मॅडम,श्री.नारायण सोनवणे सर हे होते. शिवबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली. शिव जन्मोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवबांच्या,मावळ्यांच्या तर विद्यार्थिनींनी मासाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत मनोगते,पोवाडे,गीते गायलीत. श्रीमती. वर्षा पाटील मॅडम, श्रीमती.योगिता ठाकूर मॅडम,श्रीमती. शीतल पाटील मॅडम यांनी शिवबांचा पाळणा गायला.तर श्री.रविंद्र महाले सर यांनी शिवबांची आरती म्हटली. श्रीमती.उज्वला साळुंखे मॅडम,श्री. मनोज पवार सर,महिला पालक प्रतिनिधी सौ.सरला पाटील व कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती.जयश्री पाटील मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना श्री.राकेश पाटील सर यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती. रुपाली निकम मॅडम यांनी केले.⚔️इतिहासाच्या 📖 पानावरती शिवशंभुचे नाव वसे महाराष्ट्राच्या माती वरती पराक्रमाचे भव्य ठसे…📿जगदंब📿