नवजीवन विद्यालय पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

नवजीवन विद्यालय पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार सर होते. कार्यक्रमात उत्साहात शिवरायांचा जयघोष करत महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बी के पाटील, सहशिक्षक आर वाय चौधरी, श्रीमती एस एन भदाने, एस एस पाटील जे व्ही पाटील, एस एस परदेशी, संदीप सोनवणे, गजानन पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, जगन्नाथ निगम, कैलास राठोड, आदी उपस्थित होते.