महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागासाठी 11,18,23,29 एप्रिलला निवडणूक,अहमदनगर जिल्ह्यात चैत्र पौर्णिमेला मतदान! शिर्डीत 29 एप्रिलला रणधुमाळी !

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागासाठी 11,18,23,29 एप्रिलला निवडणूक,अहमदनगर जिल्ह्यात चैत्र पौर्णिमेला मतदान! शिर्डीत 29 एप्रिलला रणधुमाळी !

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात चार टप्प्यांत निवडणूक होणार आहे.अहमनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मात्र चैत्र पौर्णिमेला म्हणजे 23 एप्रिला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी 1) पहिल्या टप्प्यात 11एप्रिलला वाशिम – यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा- गोंदिया, रामटेक, वर्धा नागपूर या सात मतदारसंघात निवडणूक होणार आहे.2)दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या दहा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.3) तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला अहमदनगर ,औरंगाबाद, जालना, जळगाव,रावेर, रायगड, पुणे, बारामती, सांगली, सातारा, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या चौदा मतदारसंघात निवडणूक होणार आहे.4) चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला शिर्डी , नाशिक, दिंडोरी, नंदुरबार, धुळे, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे,मावळ, शिरूर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पुर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या सतरा मतदारसंघात निवडणूक होणार आहे असे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात (7), दुसऱ्या टप्प्यात (10), तिसऱ्या टप्प्यात (14), आणि चौथ्या टप्प्यात (17) जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे.असे एकूण 48 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.मागच्या आठवड्यात सोळा एप्रिल ही सांभाव्य तारीख जाहीर करण्यात आली होती. एकूणच महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्याने अनेक उमेदवारांनी आतापासूनच गुढग्याला बाशिंग बांधून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जसजशे निवडणुकीचे घोडा मैदान जवळ येऊ लागले आहे तसतसे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची झोप उडाली आहे.कोणत्या पक्षाकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाची उमेदवारी कापली जाणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गेले पाच वर्षे झोपी गेलेले महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील मौनी खासदार खडबडून जागे झाले आहेत.आणि विकासाच्या नावाने बोंबा मारू लागले आहेत.निवडनुकीच्या तारखा जाहीर झाल्या मुळे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचंड धुराळा उडाला आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना संपुर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळणार आहे.