एकलव्य संघटनेच्या आज पाचोरा तालुक्यात नव्याने शाखा नुतनीकरण संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या शुभहस्ते

एकलव्य संघटनेच्या आज पाचोरा तालुक्यात नव्याने शाखा नुतनीकरण उद्घाटनांना होणार सुरूवात

मानकी ,कुरंगी,दुसखेडा,अंतुर्ली,भातखंडे येथे शाखा उद्घाटनानंतर होणार परधाडे येथे भव्यसभा

( संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांच्या शुभहस्ते एकलव्य संघटनेच्या शाखा उद्घाटनांचा होणार श्रीगणेशा )

एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली नव्या आशेने व दमाने भरणार संघटनेत हुंकार

जळगाव राजकारण ग्रुप : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एस टी आरक्षित जागा संदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी आणि अनेक वर्षांपासुन राहिलेले मागण्या व समस्यांपासुन त्रस्त राहिलेले समाज बांधवांना अजुनही न्याय मिळाला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नव्या दमाने व नव्या उम्मीदीने लढा उभारून आज एकलव्य संघटनेचे नुकतेच प्रदेश अध्यक्ष म्हणुन निवड झालेले पवनराजे सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि एकलव्य संघटनेचे अध्यक्ष सुधाकरभाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज एकलव्य संघटनेच्या नव्या शाखा नुतनीकरण उद्घाटनांना सुरूवात होणार आहे.

आज मानकी पासुन शाखा उद्घाटनांना सुरूवात होईल त्यानंतर कुरंगी ,दुसखेडा,अंतुर्ली,भातखंडे आणि त्यानंतर परधाडे येथे भव्य सभा संपन्न होणार आहे.

या सभेकडे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे लक्ष राहणार आहे.मागील प्रदेश अध्यक्ष शिवाजीरावराव ढवळे यांनी केलेल्या कार्यकारिणी बरखास्त निर्णयानंतर’ ची पहिली सभा असल्याने म्हणुन यासभेकडे विशेष बघणे सुरू आहे.

लवकरच पाचोरा-भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातं एकलव्य संघटनेच्या शाखा नुतनीकरण होतील.