एम एम महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी
पाचोरा- येथील एस. एस.एम. एम.महाविद्यालयात 29 ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर उप प्राचार्य प्रा.श्री एस एस पाटील , पर्यवेक्षक प्रा.डॉ.जे पी बडगुजर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापक वृंद यांनी राष्ट्रीय क्रीडा दिवस प्रतिज्ञा घेतली . तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते कौतुक करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.एस एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांना आरोग्य संवर्धनाची शपथ देण्यात आली त्या नंतर महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली पंच म्हणून प्रा. नितीन पाटील प्रा.महेंद्र महाजन प्रा.ललित पाटील प्रा. स्वप्नील ठाकरे प्रा.डॉ.डि. एस.पाटील प्रा. महेश नेरपगार
प्रा.डॉ. सुनीता गुंजाळ प्रा.मनीषा माळी प्रा.सुनीता सोहत्रे प्रा. सुजाता पवार प्रा. ऋतुजा जोशी व इतर प्राध्यापक वृंद यांनी काम पाहिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी व आभार क्रीडा प्रमुख प्रा. गिरीष पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयीन खेळाडूंनी सहकार्य केले.

























