महिलावरील होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर

महिलावरील होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर

सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव सौ प्रतिभा ताई शिरसाठ यांच्या सुचने नुसार राष्ट्रवादी पक्षाने महिलांचे निर्माण होणारे अनेक प्रश्न सोडविन्या साठी व त्यांना न्याय मिळवून देण्या साठी पाचोरा तालुका अध्यक्षा म्हणून प्रा वैशाली ताई बोरकर यांची नियुक्ती केली होती वैशाली ताई ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत ,तालुक्यात राष्ट्रवादी तर्फे महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या महिला आघाडीची कार्यकारिणी वैशाली ताई यांनी जाहीर केली त्यानुसार पाचोरा तालुका उपाध्यक्षा पदी प्रा.सुनीता मुनिर सोहत्रे,
पाचोरा शहर अध्यक्षा पदी सौ रेश्मा सुनील नावगिरे,
पाचोरा शहर सचिव पदी
सौ कीर्ती अजय अहिरे यांची नेमणूक करण्यात आली या बाबत चे नियुक्ती पत्र पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मा.दिलीप भाऊ वाघ व सौ प्रतिभा ताई शिरसाठ यांच्या हस्ते देण्यात आले त्या वेळी सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्ष वैशाली ताई बोरकर,नगरसेविका सौ सुचेता ताई वाघ,भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील भडगाव युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील व संदीप चव्हाण व राष्ट्रवादी पक्षा च्या महिला व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते