लोहारा येथील प्रा.आ. केंद्राच्या इमारतीला अखेर वर्क ऑर्डर प्राप्त

लोहारा येथील प्रा.आ. केंद्राच्या इमारतीला अखेर वर्क ऑर्डर प्राप्त

लोहारा (प्रतिनिधी ) येथील प्रा. आरोग्य केंद्राची वर्कऑर्डर मंजूर असूनही निघत नसल्याने नाईलाजाने येथील सरपंच अक्षय जैस्वाल व सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यांना उपोषणाला बसावे लागले होते.जवळपास 6 दिवस जि. प.समोर उपोषण चालले,मात्र जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना उपोषणस्थळी यायला किंवा उपोषण कर्त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नसल्याचे सर्व उपोषणकृत्ये सांगतात. या वरून त्यांच्यावर किती राजकीय दबाब होता हे आपल्या लक्षात यायला वेळ लागणार नाही.
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची वर्क ऑर्डरअखेर मंत्रालयातून प्राप्त झाला असुन, सदर इमारतीच्या जागेची पाहणी करताना जि.प.सदस्य भाऊसाो दिपक सिंग राजपूत, उध्दव मराठे, सरपंच भाऊसो अक्षयकुमार जैस्वाल,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरूण पाटील, उपअभियंता नंदू पवार,शाखा अभियंता वाडीले,शिवसेना गट प्रमुख दिनकर गिते गण प्रमुख तुषार कासार ग्रा.प सदस्य व उपोषणकर्ते ईश्वरभाऊ देशमुख,अशोक क्षीरसागर, सुरेश चौधरी, अर्जून पाटील,अशोक चौधरी, नाना चौधरी, निलेश चौधरी,अतुल बरकले,संभाजी लिंगायत ,दिलीप गायकवाड इस्माईल दादा, गफ्फार मिस्त्री, ,सुरेश मोरे,विशाल गिते, सुभाष देशमुख पत्रकार दिनेश चौधरी, महेंद्र शेळके,कृष्णराव शेळके, अतुल माळी, सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
*प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा लवकरच पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होईल होणार असल्याचे कळते .