राघोहिवरे येथे सौर ऊर्जा पंप बसविण्यासाठी वायरमनला २५०० रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राघोहिवरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा पंप बसविण्यासाठी वायरमनला २५०० रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या बाबतची माहिती अशी की यातील तक्रारदार यांच्या आईच्या नावे मागेल त्याला सौर ऊर्जा क्रुषी पंप या योजने अंतर्गत क्रुषी पंप मंजूर झाला होता.त्या नंतर तक्रारदार यांच्या गावाकरीता नेमून दिलेले वायरमन राजेंद्र दादासाहेब कराळे वय (वर्षे ४१),बाह्यश्रोत वायरमन,नेमणूक महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित करंजी कक्ष, तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हे सौर ऊर्जा क्रुषी पंप बसविण्यासाठी तक्रारदार यांच्या शेतामध्ये गेले.त्यांनी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये सदर जागेचे फोटो काढले व तक्रारदार यांना म्हटले की सौर ऊर्जा क्रुषी पंपाच्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या लाईटचा पोल आहे.त्यामुळे तुमचा सौर ऊर्जा क्रुषी पंपाचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.जर सौर ऊर्जा क्रुषी पंप मंजूर करायचा असेल तर ४००० रुपये द्यावे लागतील अशी तक्रारदार यांच्या कडे लाचेची मागणी केली.कराळे वायरमन हे सतत प्रकरण नामंजूर करण्याची धमकी देत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजाने कराळे वायरमन यांना दोन हजार रुपये दिले.त्या नंतर कराळे वायरमन यांनी तक्रारदार यांना उरलेले दोन हजार रुपये सौर ऊर्जा क्रुषी पंप बसविल्यानंतर दे असे सांगून तेथुन निघुन गेले.त्यानंतर तक्रारदार यांच्या शेतामध्ये सौर ऊर्जा क्रुषी पंप बसविण्याचे काम पूर्ण झाले.मग नंतर कराळे वायरमन हे तक्रारदार यांच्या शेतामध्ये सौर ऊर्जा क्रुषी पंप बसविण्याच्या ठिकाणी सर्वे पुर्ण केल्याच्या मोबदल्यात २००० रुपये व तक्रारदार यांच्या घरात्या घराच्या विजमिटरला सिंगल फेजचे विज कनेक्शन जोडण्यासाठी ५०० रुपये असे एकूण २५०० रुपयांची लाच मागणी करीत असल्या बाबतची तक्रार अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.सदर तक्रारी मध्ये दिनांक १७/८/२०२५ रोजी आरोपी वायरमन राजेंद्र कराळे यांनी तक्रारदार यांच्या कडून २५०० रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. नंतर आरोपी वायरमन राजेंद्र दादासाहेब कराळे यांना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायदा १९८८अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सापळा पथकामध्ये अहिल्या नगर जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे,यांच्या नियंत्रनाखाली पोलिस नाईक उमेश मोरे, चंद्रकांत काळे, पोलिस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, शेखर वाघ,चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल हारुन शेख यांचा समावेश होता.सदरची ही कारवाई नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. नाशिक विभागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्या कडे कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ ॲंटीकरप्शन ऑफ ब्युरो अहिल्या नगर येथील दुरध्वनी क्रमांक (०२४१)२४२३६७७ आणि मोबाईल नंबर ८३२९७०२३४४ टोल फ्री क्रमांक १०६४वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पाथर्डी तालुक्यात लाचखोर अधिकारी यांचे जास्त प्रस्थ माजले आहे.गेल्या आठवड्यात एका तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले होते आता ही दुसरी घटना घडली आहे.