तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत गो.पु.पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश

_तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत गो.पु.पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश..!!!!_

*भडगाव (प्रतिनिधी) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव तसेच किसान स्पोर्ट्स अकॕडमीच्या खेळाडूंनी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे ब.ज.हिरण,विद्यालय,कजगाव येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय बुध्दिबळ स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

*बुध्दिबळ स्पर्धेतील विजयी खेळाडू….!!!!*

*१७ वर्षे (मुली)*

१) देवयानी दिलीप पाटील
२) नंदिनी प्रकाश पाटील
३) अंजली योगेश पाटील

*१९ वर्षे (मुली)*

१) मनस्वी सोनुसिंग पाटील
२) वृषाली सुभाष पाटील
३) सानिया युनूस तांबोळी
४) नुतन कैलास पाटील
५) स्वप्नाली सुनिल पाटील

*१९ वर्षे (मुले)*

१) कमलेश योगेश पाटील
२) पराग नितीन पाटील
३) सुमीत सावता पाटील
४) कृष्णा रावसाहेब पाटील
५) अमोल प्रदीप पाटील

वरील विजयी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,माध्यमिक सोसायटी संचालक जगदीश पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.