पाचोरा महाविद्यालयातील प्रा. एस. बी. तडवी यांना पीएच. डी. पदवी प्रदान

पाचोरा महाविद्यालयातील प्रा. एस. बी. तडवी यांना पीएच. डी. पदवी प्रदान

पाचोरा दि. 11 फेब्रुवारी – पाचोरा येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एस. बी. तडवी यांनी “महाराष्ट्रातील तडवी भिल्ल जमातीच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा विशेष अभ्यास´´ (कालखंड 1990 ते 2010) या विषयावर प्रो. डॉ. मंगला जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध तयार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे सादर केला होता. विद्यापीठाने त्यांना सदर विषयावरील संशोधन कार्याबद्दल डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) ही पदवी बहाल केली.
प्रा. एस. बी. तडवी यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पीएच. डी. पर्यंतची पदवी संपादन केली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी, कनिष्ठ व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब सुरेश रूपचंद देवरे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य मा. प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील तसेच पी. टी. सी. परिवार व महाविद्यालय परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.