धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर मेंढरांचा एल्गार मोर्चा संपन्न

धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर मेंढरांचा एल्गार मोर्चा संपन्न

 

(सुनिल नजन/ “चिफब्युरो” अहमदनगर जिल्हा) सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पंढरपूर, लातूर, नेवासाफाटा, वैजापूर, जालना, पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस तारखेला जोरदार निदर्शने,रास्ता रोको, करण्यासाठीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला मेंढरासह रास्ता रोको एल्गार मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे काढण्यात आला होता. भाजपचे नेते अशोक कोळेकर आणि नेवासा तालुक्यातील सकल धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजासाठी एसटी प्रमाणपत्राची त्वरीत अंमलबजावणी करण्यासाठी आणि उपोशनार्थींना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सरकारने या आठवडा भरात एसटी प्रमाणपत्राच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्यास प्रवरा संगम येथील गोदावरीच्या नदी पात्रात पुलावरून उड्या टाकून जलसमाधी घेण्यासाठीचा ईशारा नेवासाफाटा येथे उपोषणाला बसलेल्या प्रल्हाद सोरमारे(संभाजी नगर),बाळासाहेब कोळसे(पाथर्डी), राजूमामा तागड (मीरी-पाथर्डी), रामराव कोल्हे(जालना), देविलाल मंडलिक,(जामखेड), भगवान भोजने (अंबड),यांनी दिला आहे. उपोषणाला बसलेल्या दोघाजनांची प्रक्रुती खालावली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नामदेव खंडागळे गुरुजी, राम देशमुख, बाबासाहेब रोडगे,भाजपाचे नेते विठ्ठलराव लंघे,अजित पवार गटाचे अब्दुल शेख,अण्णासाहेब शेंडगे, संपतराव बुळे,सुनिल सोनवणे, राजेंद्र शेंडगे, कैलास मदने, माधवराव शेंडगे, शंकर शेंडगे, सरूनाथ महानोर, दत्ता नजन,बाळासाहेब पंडीत, तुषार शिंदे, काशिनाथ आयनर,भाउसाहेब गर्धे,अशोकराव मिसाळ, रामचंद्र गंगावणे,जिजाबा लोंढे, दुर्योधन लोंढे, लक्ष्मण भानगुडे,आंबादास लोंढे, सोन्याबापू रुपनर,रामभाऊ भानगुडे, कचरू भागवत, रावसाहेब नवगिरे साहेब यांच्या सह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.