एच पी गॅस टॅंकर मधुन भारतगॅस च्या टाक्या अवैध रीत्या भरुन गॅस चोरी करणारे आरोपी रंगेहाथ पकडले,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एच पी गॅस टॅंकर मधुन भारतगॅस च्या टाक्या अवैध रीत्या भरुन गॅस चोरी करणारे आरोपी रंगेहाथ पकडले,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) एच पी गॅस टॅंकरमधून भारत गॅसच्या टाक्या अवैधरीत्या भरुन गॅस चोरी करणारे आरोपी रंगेहाथ पकडले अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली तात्काळ कारवाई. या बाबतची माहिती अशी की, दिनांक 07/12/2025 रोजी स्थानिक गून्हेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती की केडगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टायर या गोडऊन मध्ये एच पी गॅस टॅंकरमधून भारत गॅसच्या टाक्या अवैधरीत्या भरुन गॅसची अवैधरित्या हेराफेरी करून चोरी होत आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी हरिष भोये,अनंत सालुगडे,व पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, दिपक घाटकर, विरप्पा करमल, राहुल द्वारके, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, सतिष भवर, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे,भगवान धुळे, अरुण मोरे अशा पोलिस अधिकाऱ्यांचे एक पथक नेमुन सांगितलेल्या ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या सुचना देवुन पोलिस पथकास रवाना केले.सदर पथकाने तात्काळ केडगाव बायपास रोडलगत असलेल्या पत्र्याचे गोडाऊनमध्ये गॅस रिफिलींग होत असल्याची खात्री केली आणि मग सदर ठिकाणी छापा टाकुन गॅस रिफीलिंग करत असलेल्या इसमांना ताब्यात घेवुन,त्यांना पथकातील पोलीसांची व पंचांची ओळख सांगुन,त्यांचे नांव गाव विचारले असता,त्यांनी त्यांचे नांव 1) कृष्णा मधुकर दहिफळे (वय 30 वर्षे) रा. कोळवाडी,पोस्ट किनगाव, ता. अहमदपुर, जिल्हा लातुर, 2) अदित्य सुनिल पवार (वय 21 वर्षे)राहणार बीबी ता.लोणार जिल्हा बुलढाणा, हल्ली राहणार निल हॉटेल, केडगांव, अहिल्यानगर,3) विश्वास त्रिंबक शिंदे (वय 51 वर्षे) राहणार केडगांव, अहिल्यानगर,4) जनातुल शेख (वय 19 वर्षे) राहणार चापरा, बांगलजी, तालुका/ जिल्हा नदीया,वेस्ट बंगाल,हल्ली राहणार निल हॉटेल,केडगांव अहिल्यानगर, असे असल्याचे सांगितले. त्यानंतर गोडाऊनच्या मालका बाबत विश्वास त्रिंबक शिंदे यांचेकडून माहिती घेतली असता सदर गोडऊनचे मालक हे 5) राजु साबळे राहणार केडगांव, अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांना ते रिफिलींग करीत असलेल्या कामाबाबत शासकीय परवाना आहे काय? असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगुन, स्वतःचे आर्थिक फायद्या करीता एच.पी.गॅस टॅंकरमधुन लबाडी करुन भारत गॅसच्या व्यवसायीक टाक्यमामध्ये गॅस भरत असल्याचे सांगितले. पोलिस पथकाने घटना स्थळावर पंचासमक्ष पंचनामा करुन 1) 8,36,339 रुपये किंमतीचा एच.पी. कंपनीचा 17 टन गॅस, किंमत 30,00,000 रुपये किंमतीचे टॅकर, 2) 60,000 रुपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 20 रिकाम्या गॅस टाक्या, 3) 22,500 रुपये किंमतीच्या भारत गॅस कंपनीच्या 05 भरलेल्या गॅस टाक्या,4) 2,00,000 रुपये किंमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो ,5) 500 रुपये किंमतीचा एक अडजेस्टेबल लोखंडी पाना,6) 5,000 रुपये किंमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, 7) 2000 रुपये किंमतीचे गॅस भरण्यासाठी वापले जाणारे पाच पाईप असलेले नौजल असा एकुण 41,26,339 रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसुन ते बेकायदेशिर रित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता एच.पी. गॅस कंपनीच्या गॅस टॅंकरमधुन भारत गॅस कंपनीच्या व्यवसायीक गॅस टाक्यामध्ये रिफिलींग करीत असताना ज्वलनशिल पदार्था बाबत कोणत्याही प्रकारची पुरेशी काळजी न घेता स्वत:च्या व इतरांचे जिवीतास धोका निर्माण होईल,अशा धोकादायक पध्दतीने रिफिलींग करतांना मिळुन आले आहेत.ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द अहिल्यानगर च्या कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजीस्टर नंबर 1110 /2025 भारतीय न्याय संहिता कलम 287, 288, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3, 7,सह एल पी जी गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3(2)(b) सह गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46,सह स्फोटके अधिनियम 1884 चे कलम 9(b) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही सरकारी कंपन्या आहेत.परंतू या कंपनीच्या डोळ्यात धुळफेक करीत हे महाभाग गॅसचा काळाबाजार करीत आहेत.ग्रामिण भागातील अनेक ठिकाणी गॅसच्या टाक्या जादा दराने विक्री करून ग्राहकांची लुटमार करीत आहेत. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेवटच्या घटकातील उज्वला योजनेच्या ग्राहकांना थेट 950 रू दराने टाक्यांची विक्री केली जात आहे. सारा सावळा गोंधळ सुरू असुन तेरी भी चूप आणि मेरी भी चूप या म्हणीप्रमाणे कारभार बिनबोभाटपणे सुरू आहे.सर्व सामान्य ग्राहक मात्र या काळ्या बाजारामध्ये भरडून निघत आहे.