लोहारासुपुत्र अर्जुनभोई यांना खान्देशभूषण पुरस्कार जाहीर

लोहारासुपुत्र अर्जुनभोई यांना खान्देशभूषण पुरस्कार जाहीर

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान दिलेले, देत असलेले लोहारासुपुत्र तथा समाजभुषण आणि डॉ जेजी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा व आचार्य गजाननराव गरुड विद्यालय, शेंदुर्णी येथील माजी विद्यार्थी श्री अर्जुन रामचंद्र भोई यांना राजनंदिनी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जळगांव यांच्या माध्यमातून संस्थेचा सर्वोच्च सन्मान खान्देश भूषण पुरस्कार रविवार दिनांक ५/१२/२०२१ रोजी अल्पबचत भवन कलेक्टर आँफीस जळगाव येथे देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. लोहारासुपुत्र श्री अर्जुनभोई यांनी आपल्याला अनेक पातळ्यांवर आपल्या सेवाभावी कार्यातून स्वतः ला सिध्द केले आहे. खान्देशभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत असल्यामुळे लोहारा परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आजपर्यंत त्यांना अनेक मान सन्मानाने राज्यात व राज्याबाहेर ही सन्मानित करण्यात आले आहे त्यात विशेष म्हणजे भिवंडी येथे बाराबलुतेदारांचा महाराष्ट्र समाज भूषण, पुणे येथे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे येथे मल्लाव समाज सन्मान, नागपूर येथे समाज मित्र, भोई गौरव सन्मान, नवी दिल्ली येथे समाज साथी, धुळे येथे भोई समाज भूषण, मध्यप्रदेश शिवपुरी येथे समाज साथी … अशा दशकाच्या पटीतील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.