रोटरी क्लब पाचोरा भडगाव चा पदग्रहण उत्साहात साजरा
पाचोरा. काल दि 20 जुलै रोजी मावळते अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील व सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्याकडून नुतन अध्यक्ष म्हणून डॉ. मुकेश तेली तर सचिव म्हणून डॉ. अजयसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी
डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, के. बी. पाटील (माजी कुलगुरू कवियत्री बहिणाबाईचौधरी उ.म. वि .जळगाव), उप प्रांतपाल किरण देशमुख उपस्थित होते. मावळते सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. पवनसिंग पाटील यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मावळते अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी नुतन अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांना अध्यक्षपदाची पिन, कॉलर, हॅमर, चार्टर प्रधान केला. मावळते सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी नुतन सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांना पदाची पिन कॉलर दिली. पदभार स्विकारल्यानंतर डॉ. मुकेश तेली यांनी आपल्या संकल्पात जवळपास पाचोरा भडगाव पंचक्रोशीतील 75000 मुलांची थॅलेसेमिया तपासणी, इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी 5000 विद्यार्थ्यांना आयडील स्टडी ऍप चे वितरण, मुलींसाठी गर्भाशय कॅन्सर लसीकरण असे अनेक संकल्प बोलून दाखवले. प्रमुख पाहुणे के. बी. पाटील आणि प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नविन 12 सदस्य यांनी रोटरी प्रवेश केला. नविन सदस्यामध्ये संजय कोतकर, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ हेमंत पाटील, शैलेश कुलकर्णी, प्रज्ञेश खिलोशिया, स्वप्नील पटवारी, प्रा. वैशाली बोरकर, श्रीमती ऋतुजा देशपांडे, चिंतामण पाटील, नितीन जमदाडे,मनोज केसवानी, त्यामध्ये तहसीलदार बनसोडे साहेब यासोबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे मानद सदस्यत्व देण्यात आले. प्रांतपाल यांच्या हस्ते इन्टेरॅक्ट क्लब मधील तीन विद्यार्थिनी यांना आयडियल स्टडी ऍप देऊन ऍप वाटपाची सुरुवात करण्यात आली. पाचोरा भडगाव रोटरी क्लबच्या संकल्पनेतून 100 शाळांना प्रथमोपचार पेटी देण्याच्या उपक्रमाला सुरुवात म्हणून 10 शाळांना प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट वर निवड झालेले पदाधिकारी आणि मेजर डोनर भरत सिनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जॅक्सन डान्स अकॅडेमी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर गणेशवंदना सादर केली तर पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयच्या श्रीमती विद्या संजय कोतकर मॅडम यांनी स्वागतगीत म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी नुतन सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील व श्रीमती अरुणा उदावंत यांनी केले. कार्यक्रमासाठी चाळीसगाव, जळगाव, अकोला, नासिक येथील रोटरी पदाधिकारी व रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे सर्वं माजी अध्यक्ष, पदाधिकारी, रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.