गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयात बक्षीस वितरण सोहळा संपन्न

गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयात बक्षीस वितरण सोहळा संपन्न

कोळगाव ता.भडगाव- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे २३ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व.हरी रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित विविध स्पर्धेतील विजेते व उपविजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

  यावेळी स्पर्धेत कु.निकीता सोनवणे,कु.तेजस्विनी पाटील,कु.वैष्णवी पाटील,कु.सारिका पाटील,कु.हर्षदा पाटील,कु.तृप्ती बोरसे,चि.आदित्य जाधव,चि.ऋषिकेश सुतार,चि.रामदास मोरे,चि.शुभम महाजन,कु.संजना पाटील,चि.जयेश अहिरे,चि.शुभम पाटील,कु.वैदेही साळुंखे,चि.ललीत हिरे इ. विजेते – उपविजेतेपद प्राप्त विद्यार्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

  संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव डॉ.पुनम पाटील,मंत्रालयातील अव्वर सचिव प्रशांतराव पाटील यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक ए.एच.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यात कार्यवाहक प्रा.आर.ए.पाटील,प्रा.किशोर चौधरी,प्रा.एम.ए.पवार,प्रा.मनेष पाटील आदिंच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली.रंगतदार चाललेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील तर आभार प्रदर्शन प्रा.प्रवीण बोरसे यांनी केले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.