निवडणूकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या प्रचाराला अहमदनगर मध्ये जोरदार सुरुवात  तर विरोधी आ.लंकेचे तळ्यात मळ्यात 

निवडणूकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या प्रचाराला अहमदनगर मध्ये जोरदार सुरुवात  तर विरोधी आ.लंकेचे तळ्यात मळ्यात

(‌सुनिल नजन चिफ ब्युरो अहमदनगर जिल्हा) ‌ निवडणूक आयोगाने नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची घोषणा दिल्ली येथे पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर केली.सर्वच राजकीय पक्षांच्या तिकिट वाटपाचा घोळ अजून सुरू असतानाच भाजपाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे सांभाव्य उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराची सोशल मीडिया वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नुसती उमेदवारीची घोषणा केली तरी सर्व विखे यंत्रणा सज्ज झाली आहे.अजून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात होणार आहे. विरोधी पक्षात अजूनही तिकिटासाठी चलबिचल सुरू आहे.कोणती जागा कोणत्या पक्षाला यांचा काहीही ताळमेळ लागत नाही आणि विखे पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आहेत. मतदारसंघात सर्वच तालुक्यातील प्रचार कार्यालयाचे योग्य रीतीने नियोजन करण्यात आले आहे. ,पारनेर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, शेवगाव -पाथर्डी, नगर, राहुरी (देवळाली प्रवरा मंडल वगळून) या आठ तालुक्याचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. निवडणूकीची घोषणा होण्यापुर्वीच दाळ साखर वाटप कार्यक्रम आयोजित करताना सर्व मतदारसंघात प्रचार कार्यालयाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.अहमदनगर दक्षिणेत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके की त्यांच्या सौभाग्यवती राणी लंके या नावावर अजूनही उमेदवारी साठी एकमत होउन शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.निलेश लंके हे‌ नेमके कोणत्या पवारांकडे आहेत हे निवडणूक अर्ज दाखल करेपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले जाणार आहे असे चित्र निर्माण झाले आहे. विखे विरोधात लंके ही लढत जोरदार होण्याची चिन्हे आता पासूनच निर्माण झाली आहेत.काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आतापासूनच पैजा लावायला सुरुवात केली आहे.निवडनुक काळात कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही हे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. संपूर्ण देशभर निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.मतदार संघात अजून निवडणूक पुर्व वादळाची शांतता असल्याचे दिसून येत आहे.