भडगावात उदंड उत्साहात पार पडली निष्ठावंतांची दहीहंडी !
पदाधिकाऱ्यांचा उत्साह व जनतेच्या प्रतिसादाने भारावले : वैशालीताई सुर्यवंशी
भडगाव, दिनांक १ (प्रतिनिधी ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या माध्यमातून शहरात आयोजीत करण्यात आलेल्या निष्ठावंतांच्या दहीहंडी कार्यक्रमाला भडगावकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारोंच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी भडगावात निष्ठावंतांची दहीहंडी कार्यक्रम घोषीत केला तेव्हापासून अगदी नावापासून याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. शनिवारी रात्री उशीरापर्यंत हा दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी वैशालीताई आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यासोबत शिवरायांची लाईव्ह आरती सादर करण्यात आली. आरती झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार पुष्पवर्षाव करत वैशालीताई सुर्यवंशी यांचा सत्कार केला. याप्रसंगी सोशल मीडियात रील स्टार म्हणून लोकप्रिय असणारे तृप्ती माने व भूषण परदेशी यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी वैशालीताई म्हणाल्या की, निष्ठावंतांची दहीहंडी हा कार्यक्रम स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजीत केला असून तो माझ्यासाठी सरप्राईज आहे. दहीहंडीतील थरांप्रमाणेच आपला पाया हा तत्वनिष्ठा व संस्कारांनी मजबूत असला पाहिजे. पाया मजबूत नसल्यानेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे उदाहरण देत त्यांनी तत्व व संस्कारांचा पाया आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तर निष्ठावंतांची दहीहंडी या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद पाहून आपण भारावले असल्याचे देखील त्यांनी आवर्जुन नमूद केले.
यानंतर विविध मराठी, अहिराणी व हिंदी गाण्यांवर उपस्थितांनी जोरदार ताल धरला. याप्रसं विशेष करून तरूणाईचा उत्साह हा ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले. त्यांनी विविध गाण्यांवर अतिशय बहारदार नृत्य केल्याने वातावरण चैतन्यदायी बनले. तसेच क्रेनला लटकावलेली दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांनी प्रयत्न सुरू केले. यात विविध मंडळांना अपयश आल्यानंतर चाळीसगाव येथील महावीर गोविंदा पथक या मंडळाने बाजी मारत निष्ठावंतांची दहीहंडी फोडली असता उपस्थितांनी जोरदार जल्लोष केला.
या कार्यक्रमाला मा. खासदार उन्मेष दादा पाटील, मातोश्री कमलताई पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, मा. जि.प. सदस्य दिपक राजपूत, मा. जि. सदस्य उद्धव मराठे, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पवार, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, मा. सभापती रामकृष्ण पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील, मा. उपसभापती राजेंद्र पाटील, उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, मा. नगरसेवक मनोहर चौधरी, तालुका प्रमुख जे.के.पाटील, शेतकी संघ संचालिका योजना पाटील, मा. नगरसेवक राजेंद्र देशमुख, मा. नगरसेवक सुभाष पाटील, मा. नगरसेवक इसाक मलिक, मा. नगरसेवक भिकणुर पठाण, मा. सदस्य संतोष पाटील सर, मा. प्राचार्य डी. डी. पाटील सर, उप जिल्हा युवाधिकारी माधव जगताप
युवासेना ता. प्रमुख चेतन पाटील, शहर प्रमुख चेतन रंगनाथ पाटील, पृथ्वीराज पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
तर कार्यक्रमाच्या प्रसंगी दादाभाऊ चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बंडू मोर, खंडू सोनवणे, गोरखदादा पाटील, पप्पूदादा पाटील, रतन परदेशी राजेंद्र मोटे, शाम सर, यश पाटील, पप्पू राजपूत, गजानन सावंत, संदीप जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, हरीभाऊ पाटील, राकेश सोनवणे, नितीन खेडकर, नितीन सोनवणे, अरमान तडवी, अरूण तांबे, निखील भुसारे, संतोष पाटील, जयश्री येवले, कुंदन पांड्या, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, द्वारकाताई सोनवणे, उषाताई परदेशी, गायत्रीताई पाटील, ज्योत्स्नाताई पाटील, सिंधूताई वाघ, सविताताई चौधरी, सुषमाताई भावसार, सुरेखाताई वाघ, रेखाताई शिरसाठ, गायत्रीताई पाटील, सोनालीताई पाटील, नसीमबानो पठाण, निताताई भांडारकर, मनीषाताई पाटील, वैशलीताई अमृतकर व मीनाक्षीताई पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.