क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

क्षत्रिय माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

 

आज दिनांक 23 जुलै २०२३ रोजी वार रविवार रोजी क्षत्रिय माळी समाज कार्यालय कोंढवाडा गल्ली पाचोरा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अतुल महाजन,माऊली हॉस्पिटल.प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले सर,, प्राचार्य डॉक्टर बी एन पाटील सर,एम एम कॉलेज ,डॉक्टर प्रवीण माळी, डॉक्टर दिनेश माळी ,डॉक्टर जी एस महाजन ,डॉक्टर संजय माळी श्री भास्कर महाजन ,माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष के एस महाजन सर प्राध्यापक एम एस महाजन सर ,सचिव गीते सर विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले ,संत शिरोमणी सावता महाराज विठ्ठल रखुमाई गणेश जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाज अध्यक्ष श्री के एस महाजन सर यांनी केले व सूत्रसंचालन पंचमंडळ सचिव शरद गीते सर यांनी केले कार्यक्रमास पंचमंडळ अध्यक्ष श्री के. एस. महाजन सर ,माजी अध्यक्ष संतोष भास्कर महाजन ,माजी अध्यक्ष चिंधु बळीराम मोकळ ,माजी अध्यक्ष संजय शिवाजी महाले, नाना सांडू महाजन गोरख महाजन ,सुनील अशोक महाजन , सुदर्शन महाजन,शुभम अशोक महाजन कन्हैया देवरे ,नामदेव महाजन ज्ञानेश्वर महाजन प्रदीप महाजन, मयूर महाजन, वनराज महाजन व इतर कार्यकारणी उपस्थित होते तसेच विश्वस्त मंडळ कोषाध्यक्ष श्री श्रीराम मोतीराम महाले यांचे मार्गदर्शन लाभले.