पहुर येथे धाडसी चोरी. किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास.पहूर पोलिस यांच्यासमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहुर येथे धाडसी चोरी. किराणा दुकानातून रोकड सह किराणा सामान लंपास.पहूर पोलिस यांच्यासमोर चोरांनी उभे केले आव्हान

पहूर (प्रतिनिधी)

पहूर बसस्थानक समोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्स मधील मुळचंद झुंबरलाल चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजन दुकानाचे शटर कुलूप तोडून चोरांनी 4 ते 5 हजार रोकड सह 12 ते 13 हजार रुपयांचे किराणा सामान लंपास केला आहे.

सदरील चोरीची घटना ही सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता समोर दुकानाचे कुलूप तोडण्याचे दिसून आल्याने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसानं समोर दुकानाचे शटर उघडून पाहणी केली असता दुकानातील ड्रॉवर खुले दिसून आले. तसेच दुकानातील कागदपत्र देखील अस्ताव्यस्त दिसून आले.

दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावरानी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव इ प्रकारचे साबण, पाउडर तसेच किरकोळ वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे.

सदरील घटनेची अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून भा.दं.सं. 1860 कलम 457 व 380 नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास पहूर पोलिस कर्मचारी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बनसोड साहेब, ज्ञानेश्वर ढाकरे व पोलिस कर्मचारी करीत आहे.