प्रकाश तेली यांच्या पेड़ की महत्ता काव्य संग्रहातून झाडांचे महत्व आणि वेदना कळतात – अभिनेता मनोज जोशी

प्रकाश तेली यांच्या पेड़ की महत्ता काव्य संग्रहातून झाडांचे महत्व आणि वेदना कळतात – अभिनेता मनोज जोशी

 

 

जळगांव :- जागतिक विक्रम केलेले कवी, लेखक, पत्रकार आणि गीतकार प्रकाश रामदास तेली यांच्या पेड़ की महत्ता (झाडांचे महत्त्व) ह्या काव्य संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ हिंदी अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते गोवा येथे अंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात करण्यात आले. यावेळी डॉ. सिद्धांत तेली व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते. पेड़ की महत्ता काव्य संग्रह हा झाडांचे महत्व आणि वेदना यांचे दर्शन घडविते असे गौरोद्गार त्यांनी ह्याप्रसंगी काढले. प्रकाश तेली सर्वच कविता संग्रह हे सामाजिक चळवळीला दिशा व गती तर देत आहेतच सोबत समाज प्रबोधनाचे देखील कार्य करीत आहेत असे गौरोद्गर देखील त्यांनी काढले.

 

पेड़ की महत्ता काव्य संग्रह वृक्ष संवर्धन किती गरजेचे आणि आवश्यक आहे याची जाणीव करुन देणार कविता संग्रह आहे असे गौरोद्गर इतर मान्यवरांनी काढले.

 

 

 

प्रकाश तेली यांचा परिचय :- प्रकाश रामदास तेली यांची विपुल अशी साहित्य संपदा असून ते जागतिक विक्रम केलेले साहित्यिक आहेत. त्यांचे विविध सामाजिक विषयांवर आतापर्यंत 14 कविता संग्रह प्रकाशित झालेले असून त्यांनी कविता व घोषवाक्य लेखनाचा विश्वविक्रम देखील केलेला आहे. त्यांच्या ह्या कार्याची विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये नोंद देखील झालेली आहे.

 

प्रकाश तेली यांनी 5000 पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता ह्या लिहिलेल्या असून 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य देखील लिहिलेले आहेत. लवकरच त्यांच्या आयुष्य म्हणजे काय हे पुस्तक वाचकांना उपलब्ध होणार आहे.

 

काय आहे पेड़ की महत्ता काव्य संग्रहाची विशेषता:-

 

आपल्या जीवनात आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाइतकेच वृक्षांचेही महत्त्व आहे. पेड़ की महत्ता (झाडांचे महत्त्व) कविता संग्रह झाडे म्हणजे काय? झाडे काय करू शकतात? झाडे नसल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? याची जाणीव तर करुनच देतात सोबतच झाडांचे महत्त्व पटवून देण्याचे काम हा काव्य संग्रह करतो. आज जिकडे पाहावे तिकडे वाढते प्रदूषण आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे आणि त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे दिवसेंदिवस झाडांची कमी होणारी संख्या हे आहे.

 

आजही ६० टक्क्यांहून अधिक लोकांना झाडामध्ये किती गुण आहेत याची माहिती नाही. झाडांची विशेषता सर्वांना कळावी हा काव्य संग्रह लिहिण्या मागील हेतु आहे. झाडांचे केवळ पर्यावरणीय फायदे नाहीत कारण झाडं आपल्याला अन्न, इंधन, घरासाठी फर्निचर आणि इतर अनेक गोष्टी देखील पुरवतात.

 

 

 

प्रत्येकाला माहित आहे की जीवन जगण्यासाठी हवा सर्वात महत्वाची आहे आणि झाडे निस्वार्थपणे आपल्याला शुद्ध हवा देतात आणि आपले जीवन सुलभ करतात. झाडे देखील हानिकारक घटकांपासून आपले संरक्षण करतात. पृथ्वीवर निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्षांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि हेच समजावून सांगण्याचा प्रमाणिक प्रयत्न प्रयत्न पेड़ की महत्ता (झाडांचे महत्त्व) या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रकाश तेली यांनी केला आहे. पेड़ की महत्ता (झाडांचे महत्त्व) ह्या काव्यसंग्रहात वेग वेगळ्या शीर्षकाच्या 50 कवितां आहेत.