यिनच्या राजकीय संघटन मंत्रीपदी भूपेश सोमवंशी यांची निवड

यिनच्या राजकीय संघटन मंत्रीपदी भूपेश सोमवंशी यांची निवड

पाचोरा– (प्रतिनिधी)

तालुक्यातील बाळद येथील युवा सामाजिक कार्यकर्ते भूपेश राजेंद्र सोमवंशी यांची केंद्रीय मंत्रिमंडळ सकाळ यिनच्या राजकीय समितीमध्ये संघटन मंत्री पदी निवड करण्यात आलीआहे. सकाळचे महाराष्ट्र प्रदेश व्यवस्थापक शामसुंदर माडेवार व यंग इनस्पिरेटर्स नेटवर्क चे प्रमुख तथा सकाळ माध्यम समूहाचे संपादक संदीप काळे यांनी 31 जुलै रोजी च्या पत्रानुसार भूपेश सोमवंशी यांची यिन केंद्रीय कॅबिनेट राजकीय समिती संघटक पदी निवड केल्याचे पत्र दिले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भूपेश सोमवंशी हे सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 या काळासाठी भूपेश सोमवंशी यांची निवड केली असल्याचे पत्रात नमूद केले आहे. या निवडीबद्दल भूपेश सोमवंशी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.