खडकदेवळा हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

खडकदेवळा हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

खडकदेवळा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात
विविध कलागुणांची उधळण

पाचोरा – माध्यमिक विद्यालय खडकदेवळा ता. पाचोरा येथे दिनांक 31 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष धैर्यशीलराजे पवार, संस्थेच्या सचिव श्रीमती रूपालीताई जाधव, विश्वस्त विश्वजीत पवार , विश्वस्त प्रमोद गरूड, मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम व माता-पालक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वासराव पवार ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के.एस.पवार यांच्या प्रतिमांचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करत सामूहिक नृत्य , वैयक्तिक नृत्य, नाटिका , एकपात्री प्रयोग आणि गीत गायन असे विविध अंगी कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी मनसोक्त दाद दिली. या कार्यक्रमांच्या पूर्वतयारीत विद्यार्थ्यांना प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती कुंदा पाटील, स्वप्नील पाटील, सी. बी. पाटील , श्रीमती एस. बी.राजपूत मॅडम, विकी बागुल ,सागर परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे विश्वस्त श्री प्रमोद गरुड यांनी याप्रसंगी प्रास्ताविकातून आपले विचार मांडले .चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशालेचे उपशिक्षक निवृत्ती बाविस्कर यांनी किशोर कुमार यांनी गायलेले एक सुंदर से गीत यावेळी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका , आर. डी. सूर्यवंशी, एम . जे. पाटील, एन.एन. पाटील, किशोर देशमुख, सुभाष देसले, शरद साळुंखे, अनिल घोडेस्वार, ईश्वर पाटील, सुनील गुजर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी परिश्रम घेतले.