पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आ. किशोर आप्पा पाटील 

पाचोरा भडगाव मतदार संघातील नागरिकांना विविध योजनेची माहिती व मदत गावागावात जाऊन शिबिराद्वारे देण्यात येणार आहे आमदार किशोर आप्पा पाटील

 

प्रतिनिधी पाचोरा

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांची माहिती नसल्याने त्याच्या उपयोग करता येत नाही त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने पाचोरा भडगाव मतदार संघ विविध योजनांची माहिती चे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्यालयामध्ये माहिती व मदत आलेल्या नागरिकांना करण्यात येणार आहे यामध्ये तहसील कचेरीत पुरवठा विभागात रेशन कार्ड साठी लागणारी मदत तसेच पंचायत समितीमध्ये विविध योजनांची माहितीसाठी मदत

यामध्ये बाल संगोपन श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार आयुष्यमान भारत कार्ड आ भा कार्ड

नवीन मतदान कार्ड दुरुस्ती करणे इतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अशा विविध योजनांची माहिती व मदत करण्यात येणार आहे तरी वरील योजना संदर्भात आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ शिवसेना कार्याला संपर्क साधावा शिबिराला प्रभाग क्रमांक आठ मधून सुरुवात करण्यात आलेली आहे यावेळेस यांनी काम पाहिले जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार प्रताप हटकर

शुभम बागुल राजेश जमदाडे संदीप पाटील आशा सेविका वैशालीताई यांनी काम पाहिले