दोन दिवसात रस्ता खुला करून देण्याच्या तहसीलदार यांच्या आश्वासना नंतर कोपरे ग्रामस्थांचे उपोषण मागे

दोन दिवसात रस्ता खुला करून देण्याच्या तहसीलदार यांच्या आश्वासना नंतर कोपरे ग्रामस्थांचे उपोषण मागे

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवरस्ते,पांदन रस्ते,शेतरस्ते तातडीने खुले करून देण्याचे शासनाला आदेश दिलेले आहेत. या संदर्भात राज्याच्या विधीमंडळातही चर्चा झालेली आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे मात्र अनेक वेळा मागणी करूनही पांदन शिवरस्ता खुला होत नसल्याने कोपरे ग्रामस्थांच्या वतीने पाथर्डी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात आले होते.पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब यांनी उपोषणाला बसलेल्या सर्व शेतकरी ग्रामस्थांची भेट घेऊन दोन दिवसांत रस्ता खुला करून देण्यासाठी आणि साईटने सिमेंट पोल उभे करून तारा जोडून सदर रस्ता खुला करून देण्यासाठीचे आश्वासन दिले आहे.तसेच कोपरे गावठाणातील २९ सर्वे नंबर मधील जागेची मोजणी करून अतिक्रमण हटविण्याची ही कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले आहे. सदर रस्ता हा शासनाच्या आदेशानुसार बारा फूट रुंदीचा करण्यात येणार आहे.मारहाणी बाबदही कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशच तहसीलदार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या नंतरच उपोषण सोडण्यात आले. सर्कल आणि नायब तहसीलदार,भुमी अभिलेख विभाग, तलाठी,यांच्या उपस्थितीत हा रस्ता खुला करून देण्यात येणार आहे.कोपरे ग्रामस्थांचे उपोषण हाणून पाडण्यासाठी अनेक जणांनी प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता . परंतु दिवसभर उपोषणाला बसुन ही प्रशासकीय अधिकारी यांनी उपोशनार्थी कडे कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांनी महसूल विभागाला चांगलेच धारेवर धरले.मग तहसीलदार यांनी लगेचच या प्रकरणी लक्ष घालून कोपरे ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या हाता खालील सर्व अधिकारी वर्गाला आदेश दिले आहेत.त्या नंतरच उपोषण सोडण्यात आले. या उपोषणात सरपंच,उपसरपंच माजी सरपंच यांच्या सह एकुण ३५ कोपरे ग्रामस्थ सहभागी झाले होते.प्रशासन नेमका कशाप्रकारे तोडगा काढून रस्ता खुला करून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.