पीक वीमा काढून ही ७२तासात आॕनलाईन क्लेम न केल्याने नांद्रा परिसरातील शेतकरी भरपाई मिळण्यापासून रिजेक्ट
नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहार)-येथील परिसरातील सात खेड्यातील शेतकरी वर्ग यांनी बँक ऑफ बडोदा नांद्रा या शाखेत खरीप हंगामाचा जवळ जवळ 228 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा फसल योजना अंतर्गत भारतीय एक्सा कंपनीचा विमा काढला होता यामध्ये केँद्र सरकार ,राज्य सरकार व शेतकरीवर्ग यांचा एकञीत मिळून वीमा रक्कम भरुण वीमा काढण्यात येतो.या वर्षी अपेक्षा पेक्षा पावसाचा कहर हा अधिक असल्याने जुने पासून ते सप्टेंबर मुसळधार पाऊस बरसला. व 27, 28 ,29 सप्टेंबर रोजी संपूर्ण तालुक्यात ढगफुटी व अतिवृष्टी मुळे 100 मी.मी. च्या पुढेच पाऊस झाल्याने संबंधित विभागात तशा नोंदी प्राप्त झाल्याने व त्याच अनुशंगाने अतिवृष्टी जाहीर करण्यासाठी सर्व स्तरातून सर्व पक्षातून शेतकरी वर्गाच्या बाजू मांडण्यात येऊन सरसकट अतिवृष्टी जाहीर करुन ओला दुष्काळ ची मागणी करण्यात आली त्याच अनुशँगाने महाराष्ट्र सरकारने सरसकट ओला दुष्काळ व अतिवृष्टी जाहिर करुन हेक्टरी योग्य ती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश दिला परंतु दरवर्षी प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सालाबादाप्रमाणे आपल्या शेतात कृषी विमा काढला आहे त्यांना माञ७२ तासाची मुदतीत आॕनलाईन क्लेम करण्याचे संबंधित विमा कंपन्यांनी नियम लागू करून शेतकरी वर्गावर अनपेक्षित अन्यायच केला आहे ज्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू झाला त्या परिस्थितीमध्ये दररोजचा पावसाचा वाढलेला जोर, शेतात जाताना गुडघ्या बरोबर पाणी, इंटरनेट नेटवर्क समस्या ,विज समस्या,शिवार रस्ते पाण्याने तुडूंब भरलेले. याबरोबरच काही शेतकऱ्यांना आपला विमा आहे किंवा नाही हे माहित नाहि याबरोबरच क्लेम कसा करावा याबद्दल अज्ञान ,मोबाईल नेटवर्क प्रॉब्लेम अशा सर्व समस्या असूनही ज्या थोड्याफार शेतकऱ्यांनी ऑनलाइन क्लेम साठी कसातरी फॉर्म सबमिट केला त्यांना आता त्यांच्या आलेल्या डॉकयार्ड नंबर नुसार कंपनीकडून अपडेड पाहिले तर त्यांचे आय सी क्लेम रिजेक्ट करुन व त्याचे कारण मध्ये लेट इंटीमेशन असे देण्यात येऊन शेतकरी वर्गाचा क्लेम बाद ठरवण्यात येत असल्याचे त्या मोबाईल अॕप्सवर दिसत असल्याने वीमा शेतकरी हवालदिल झाले आहेत यासंदर्भात त्यांनी प्रस्तुत देशदूत प्रतिनिधी प्रा.यशवंत पवार यांच्या शी संपर्क साधला असता प्रस्तुत प्रतिनीधी यांनी *तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब* यांच्याशी फोनवरून वार्तालाप करुनयाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तालुक्यात एकुत ६८६५ शेतकरी वर्गांनी खरीप वीमा काढला आहे व याबाबत आपण अगोदरच विमा कंपनी जळगाव प्रतिनिधी प्रभातसाहेब यांच्याशी बोललो असून त्यांनी सांगितले प्रमाणे टप्प्याटप्प्याने अगोदर ज्यांनी रोखीने विमा रक्कम भरली आहे अशां शेतकरी वर्गाचा त्यानंतर ज्यां शेतकरी यांच्या कर्ज खात्यातून रक्कम वजा झाली अशा शेतकरी वर्गाचा क्लेम व ज्यांनी ७२ तासात शक्य न झालेल्या शेतकरी वर्गाँचे मुदतित आॕनलाईन क्लेम न सादर केल्याने त्यांचे आॕफलाईन माहिती दस्तावेज जमा करुन त्यांचा एकञीत डाटा वीमा कंपनी यांनी आॕनलाईन सबमीट करून त्यांचा ही विचार नंतर क्लेम साठी करण्याचे सांगितले होते परंतु आॕनलाईन क्लेम करणारे तालुक्यात अँदाजे २०% च शेतकरी आहेत असे सांगितले .मग प्रश्न येतो ज्यांनी आॕनलाईन क्लेम केला नाहि त्याँचे काय?त्यांनी वीमा फी भरली नव्हती का?अतिवृष्टी जहिर होऊन ही सरसकट वीमा लागू का नाही?आॕनलाईन क्लेम भरताना आलेल्या मोबाईल नेटवर्क समस्या ला जवाबदार कोण?ज्या प्रमाणे तुम्ही ७२तासातच आनलाईन क्लेम करण्याची अट टाकली आहे तसीच तुम्ही शेतात जाऊन स्पाॕट व्हेरीफिकेशन करायला ही ७२तासाचीच मुदत का नाही टाकली?शेतकरी वर्ग दरवर्षी कृषी वीमा काढून गुन्हा करतात काय?असे एक ना अनेक प्रश्न वीमाधारक शेतकरी वर्गाकडून करण्यात येत असून यावर्षी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने अगोदरच हिरावलाच आहे परंतु इतकी अतिवृष्टी होऊन सुद्धा ही विमा कंपनी शेतकऱ्यांना देणारी तुटपूंजी विमा भरपाई साठी ही ते वेळेचे बंधन लावून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई पासून वंचित ठेवत असून यासंदर्भात नांद्रा येथील वीमा काढणारे शेतकरी बालू हिलाल पाटील , अभिमान बबन पाटील, समाधान रघुनाथ पाटील, नाना जगन पाटील ,वरसाडे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटिल अशा २२८ शेतकरी वर्गांनी वीमा काढला असून त्यामध्ये किती लाभार्थी पाञ ठरतात हा आता औत्सुक्याचा विषय असून हे शेतकरी वर्ग दरवर्षी विमा काढत असून एक ही वर्षी वीमा भरपाई त्यांना मिळाली नाही नसून यावर्षी अतिवृष्टी झाली तरी त्याला हे वीमा कंपनीवाले वेळेचे बंधन लावून वेळ मारु पाहत असल्याचे सांगून फोन वर सुध्दा व्यवस्थित बोलत नाहीत ,फोन कट करत असल्याचे सांगून आपल्या पाणावलेल्या डोळ्यातून आम्हाला उचित भरपाई व न्याय मिळण्याची विनंती वजा अपेक्षा पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील माननीय खासदार उन्मेश दादा पाटील माननीय पालकमंत्री गुलाबराव जी पाटीलसाहेब व वीमा आधिकारीवर्ग यांच्या कडून करत आहेत.