विवाहित मुलासह आई ची विहीरीत उडी मारून आत्महत्या

विवाहित मुलासह आई ची विहीरीत उडी मारून आत्महत्या

पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील अंतुर्ली येथे विवाहित मुलासह आई ची विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची ह्रदय पिळुन टाकणारी घटना घडली आहे.

तालुक्यातील अंतुर्ली येथे काल रात्री च्या सुमारास २४ वर्षीय विवाहित युवकासह त्याच्या आई ने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आत्महत्या चे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील असुन त्याच्या आई चे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील वय ४५
आहे. दोघा माय लेकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. विहीरीत पट्टी चे पोहणार्यांनी आधी आई चे प्रेत काढले तर मुलाचे प्रेत नंतर गवसले . परीसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. दोघांचे प्रेत शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.