जळगाव शहर महानगरपालिका निवडणुक भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना दि. १५ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरवात – जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष – श्री. दिपक सुर्यवंशी

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुक भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना दि. १५ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सुरवात – जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष – श्री. दिपक सुर्यवंशी

 

 

 

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच लागणार असून यासाठी भारतीय जनता पार्टीने इतर पक्षाच्या मानाने भाजपाने आघाडी घेतली असून आगामी महानगरपालिकेच्या भाजपा इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे शुभारंभ दि. १५ डिसेंबर २०२५ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजेपासून भारतीय जनता पार्टी, जिल्हा कार्यालय, (जी.एम.फाउंडेशन जळगाव) येथे महाराष्ट्राचे राज्याचे भाजपा नेते व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हा निवडणूक प्रभारी वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, जळगाव लोकसभा खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून या मुलाखतींचे वेळापत्रक खालील प्रमाणे…

 

मुलाखती मंडल व प्रभाग निहाय घेण्यात येणार आहे…

 

मंडल क्रमांक 01… मंडल क्रमांक 02… मंडल क्रमांक 03…

वेळ – सकाळी 11 वाजेला वेळ – दुपारी 12 वाजेला वेळ – दुपारी 02 वाजेला

प्रभाग क्र- 1, 2, 3, 4 प्रभाग क्र- 5, 6, 7, 15 प्रभाग क्र- 11, 12, 13

 

मंडल क्रमांक 04… मंडल क्रमांक 05…

वेळ – दुपारी 03 वाजेला वेळ – दुपारी 04 वाजेला

प्रभाग क्र- 14, 16, 17, 18, 19 प्रभाग क्र- 8,9,10

 

 

तरी, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेवर मुलाखतीकरिता उपस्थित रहावे…!

सूचना:-

सर्व मुलाखती सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी आणि दिलेल्या वेळेतच होतील….याची कृपया सर्व इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी…! असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा संयोजक विशाल त्रिपाठी, व नितीन इंगळे सहसंयोजक जळगाव शहर महानगर पालिका निवडणूक यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवल्याचे भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.आपला नम्र मनोज भांडारकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख