Home महाराष्ट्र अतिवृष्टी अनुदानातील अनियमिततेविरोधात संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक

अतिवृष्टी अनुदानातील अनियमिततेविरोधात संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक

अतिवृष्टी अनुदानातील अनियमिततेविरोधात संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले.

सोयगाव, दि.१८ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वितरण प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने आठ दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास ‘भिक मागो आंदोलन’, धरणे आंदोलन, टक्कल आंदोलन व ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल विदवाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिले असून, काही अपात्र व्यक्तींना लाभ मिळाल्याची तक्रार आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या अर्जांची योग्य तपासणी न करता प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

निवेदनात अनुदान वितरणाची संपूर्ण यादी सार्वजनिक करणे, तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींची चौकशी करून दुरुस्ती करणे, वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान देणे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास २ जून रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघर्ष शेतकरी संघटनेने दिला आहे.

Don`t copy text!