महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे ४८ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे ४८ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार ?

(सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे.महाविकास आघाडीने सांभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असून (शिवसेना ठा‌करे गट१९ जागा) (राष्ट्रीय काॅंग्रेस १६जागा), (राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गट११जागा), आणि वंचित व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक एक जागा या प्रमाणे जागावाटपाचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.कोणत्या मतदारसंघात कोण लढणार हे पुढीलप्रमाणे ठरले आहे.१) ठाणे -राजन विचारे-उद्धव बाळासाहेब ठाकरेसेना,२) उत्तर मुंबई -संजय निरूपण -काॅंग्रेस,३) उत्तर मध्य मुंबई -नशिम खान-काॅंग्रेस,४) पश्चिम मुंबई -अमोल किर्तीकर – ठाकरे सेना,५) ईशान्य मुंबई -संजयदिना पाटील -ठाकरे सेना,६) दक्षिण मुंबई -अरविंद सामंत -ठाकरे सेना,७) दक्षिण मध्य मुंबई -अनिल देसाई -ठाकरे सेना,८) कल्याण -सुभाष भोईर -ठाकरेसेना,९) पालघर -भारती कामडे-ठाकरे सेना,१०) भिवंडी -सुरेश म्हात्रे – राष्ट्रवादी शरदपवारगट,)११) रायगड-अनंत गिते-ठाकरेसेना,१२) रत्नागिरी -सिंधुदुर्ग -विनायक राउत-ठाकरेसेना,१३)मावळ-संजय वाघिरे -ठाकरेसेना,१४) बारामती -सुप्रिया सुळे -राष्ट्रवादी शरदपवार गट,
१५) शिरूर -अमोल कोल्हे -राष्ट्रवादी शरदपवार गट,१६) सातारा -श्रीनिवास पाटील -राष्ट्रवादी शरदपवार गट,१७) कोल्हापूर -संजय पवार -ठाकरेसेना,१८) हातकणंगले -राजू शेट्टी -स्वाभिमानी शेतकरी संघटना,१९) सांगली -विशाल पाटील -काॅंग्रेस,२०) सोलापूर -प्रणिती शिंदे -काॅंग्रेस,२१) माढा -धैर्यशिल माने, राष्ट्रवादी शरदपवारगट ,२२) धाराशिव -ओमराजे निंबाळकर -ठाकरेसेना,२३) पुणे -रविंद्र धंगेकर -काॅंग्रेस,२४) संभाजी नगर -चंद्रकांत खैरे -ठाकरेसेना,२५) अहमदनगर – निलेश लंके-राष्ट्रवादी पवार गट,२६) लातूर -अमित देशमुख -काॅंग्रेस,२७)बीड-संदिप क्षिरसागर – राष्ट्रवादी शरदपवारगट,२८) परभणी -संजय जाधव -ठाकरे सेना,२९) हिंगोली -नागेश आष्टीकर आणि सुभाष वानखेडे यांच्यात जोरदार रस्सीखेच, ठाकरे सेना,३०) जालना -शिवाजीराव चोथे-ठाकरेसेना,३१) नाशिक-विजय करसकर-ठाकरेसेना,३२) शिर्डी -उत्कर्षा रुपवते -काॅंग्रेस,३३) जळगाव -गुलाबराव देवकर -राष्ट्रवादी शरदपवार गट,३४)रावेर -एकनाथ खडसे -राष्ट्रवादी शरदपवार गट,३५) नंदुरबार -के.सी.पाडवी-काॅंग्रेस,३६) धुळे -कुणाल पाटील -काॅंग्रेस,३७) बुलढाणा -रविंद्र खेडेकर -ठाकरे सेना,३८) अमरावती -बळवंत वानखेडे -काॅंग्रेस,३९) अकोला -प्रकाश आंबेडकर -वंचित आघाडी,४०) वर्धा -सुनिल केदारे- काॅंग्रेस,४१) रामटेक -प्रकाश कसबे -राष्ट्रवादी शरदपवार गट,४२) नागपूर -नाना पटोले -काॅंग्रेस, अनिश्चित,४३) यवतमाळ -वाशिम -संजय देशमुख -ठाकरे सेना,४४)भंडारा-गोंदिया या काॅंग्रेसच्या जागेवर रस्सीखेच सुरू आहे.४५) चंद्रपूर -प्रतिभा धानोरकर -काॅंग्रेस,४६)चिमुर-गडचिरोली-अनंत गेडाम, काॅंग्रेस,४७) दिंडोरी -भास्कर भगरे, राष्ट्रवादी शरदपवार गट,४८) नांदेड -शिवाजीराव मोघे -काॅंग्रेस याप्रमाणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीचे सांभाव्य तिकीट वाटप करण्यात येणार आहे. काही मतदारसंघात किरकोळ स्वरूपाचे फेरबदल अपेक्षित आहेत. कोणत्या जागेवर कोणता पक्ष लढणार हे मात्र निश्चित करण्यात आले आहे. जवळपास सत्तर टक्के तिकीट फिक्स करण्यात आले आहेत.आता महायुतीच्या जागावाटपाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.प्रत्यक्ष रणधुमाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून काही जण पाण्यात देव बुडवून बसले आहेत.तर अनेकांनी अधिक्रुत उमेदवारी न मिळाल्यास एकला चलोरे चा नारा देण्याची तयारी दाखवली आहे.उद्धव ठाकरे, शरदचंद्रजी पवार, बाळासाहेब थोरात यांनी संयुक्तपणे बैठक घेऊन या जागा वाटपाची चर्चा करून जागा निश्चित केल्या आहेत.