आदर्श समाजसेवक सुमित भाऊ पंडित यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

आदर्श समाजसेवक सुमित भाऊ पंडित यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

सुमित पंडित यांचे समाज उपयोगी विविध ४२ उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेत प्रेरनास्थान.

लोहारा (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोशियन संघटना औरंगाबाद यांच्या वतीने पोलीस पाटील दिनानिमित्त पुरस्कार सोहळा समाज रत्न पुरस्कार – २०२१ राज्यस्तरीय सामाजिक,कवी, पत्रकारिता,शैक्षणिक,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. समाजरत्न या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करनाऱ्या माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांच्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कार जाहीर करन्यात आला आहे.कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेचे राज्य समन्वयक मा.श्री.कारभारी पाटील निघोटे यानीं पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्राद्वारे कळविले आहे.
यात साहित्य,शैक्षणिक, पत्रकारिता,सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित माण्यवरांच्या गौरवण्यात येणार आहे.
या समाजरत्न पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित पंडित चा हा ८७ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना महाराष्ट्रातुन विविध ८६ पुरस्कारांनी या आधी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार सोहळा विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दि. सोमवारी २०-१२-२०२१ रोजी औरंगाबाद येथे दुपारी ०२ :०० वा पुरस्कार वितरण सोहळा होनार आहे.
या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे राज्य समन्वयक मा.श्री.कारभारी पाटील निघोटे
व कार्यक्रमाचे आयोजक यांच्या वतीने कळविन्यात आले आहे.या पुरस्कारामुळे समाजसेवक सुमित पंडित यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.