सोयगाव : पंचायत समिती सोयगावच्या प्रभारी गट विकास अधिकारीपदी अमोल जगताप रुजू
सोयगाव, दत्तात्रय काटोले
येथील तालुका पंचायत समिती कार्यालयाचे गट विकास अधिकारी एस आर यमुलवाड प्रकृतीच्या कारणाने हे दीर्घकाळ रजेवर गेल्याने जनतेची कामे खोळंबली होती.जिल्हा प्रशासनाने रिक्त असलेल्या सहायक गट विकास अधिकारी पदावर अमोल जगताप यांची वर्णी नियुक्ती केली आहे.त्यांच्याकडे सोयगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाच्या प्रभारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.
मंगळवारी अमोल जगताप यांनी सोयगाव पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
या नियुक्तीमुळे तालुक्यातील जनतेची खोळबलेली कामे जलद गतीने होतील असे सभापती उत्तम चव्हाण यांनी शुभेच्छा देताना म्हटले.























