५२ वी कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी २१ मे रोजी…!!!!
जळगाव (क्रीडा प्रतिनिधी) :– महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सोलापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५२ व्या कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी गुरुवार दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदान (व.वा. वाचनालय), जळगाव येथे घेण्यात येणार आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सर्व खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा जन्म दिनांक २५ ऑक्टोबर २००८ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक असून खेळाडू ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेत असलेला असावा. तसेच उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे प्रथम निवड चाचणी घेऊन त्यानंतर मूल्यांकन करण्यात येणार आहे. खेळाडूंनी वजन + उंची + वय यांची एकूण बेरीज २५० च्या आत असल्याची खात्री करून घ्यावी.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, सुनिल समदाणे, जयांशू पोळ व सौ. विद्या कलंत्री यांनी केले आहे.
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी जन्माचा मूळ दाखला किंवा दहावी/बारावी बोर्ड प्रमाणपत्र, ओरिजनल आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :–
राहुल पोळ – ९४०४२९२७१४, दत्तात्रय महाजन – ७०२०७५१८२३, विशाल पाटील – ९९७०३०८३२६ व दिलीप चौधरी – ९१५८४६९२९४ यांच्याशी संवाद साधावा.

















