Home महाराष्ट्र सोयगाव तालुक्यात औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोयगाव तालुक्यात औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोयगाव तालुक्यात औषध विक्रेत्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

सोयगाव : ऑनलाइन औषधी विक्री बंद करावी तसेच अन्य विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय बंदला सोयगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व औषधी दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.

दरम्यान, सकाळी ११ वाजता सोयगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने नायब तहसीलदार पत्रिके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजय शहापूरकर, दिनेश पंडित, नितीन चव्हाण, अनिकेत सोनवणे, मयुर राऊत, रवींद्र जाधव, परवेझ देशमुख, मंजूर पटेल, साद देशमुख, नावेद देशमुख, विकास मंडवे, गणेश पाटील, अमोल पाखरे, विनोद सोहनी यांच्यासह तालुक्यातील अनेक औषध विक्रेते उपस्थित होते.

ऑनलाइन औषध विक्रीमुळे किरकोळ औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता असून शासनाने तत्काळ याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

Don`t copy text!