विद्यानगरच्या डेव्हिंड कॅफे ट्रेडिंगचा फरारी संचालक सागर अंगरखे शेवगाव पोलीसांच्या जाळ्यात अडकला

विद्यानगरच्या डेव्हिंड कॅफे ट्रेडिंगचा फरारी संचालक सागर अंगरखे शेवगाव पोलीसांच्या जाळ्यात अडकला

 

(‌सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढण्याचा सपाटाच शेवगाव पोलिस स्टेशनला नव्याने बदलून आलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी लावला आहे.शेअर मार्केट घोटाळ्याची दररोज नव नवीन प्रकरणं बाहेर येत आहेत.अशाच एका प्रकारणा बाबद दिनांक ७ ऑगष्ट२०२५ रोजी प्रितम शामुवेल आढाव (वय३६)राहणार,पैठण रोड,मु.पो.ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.त्यात असे नमूद करण्यात आले आहे की शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली “डेव्हिंड कॅफे ट्रेडिंग” नावाच्या कंपनीने शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी आणि साक्षिदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या बाबत शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ६९१/२०२५ भादवी कलम ४०६,४०८,४२०, (महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण)अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी बाबत माहिती घेतली असता संशयित आरोपी हा पुर्वीच शेवगाव शहर सोडून फरार झाला असल्याची माहिती मिळाली होती.परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी याने शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे ऑफिस बंद करून तेथे डेव्हिंड कॅफे कॉफी शॉप सुरू करून तो फरार झाला होता.दिनांक ७ ऑगष्ट २०२५रोजी आरोपी हा शेवगावातील खंडोबा मैदानावर दुसऱ्या डेव्हिंड कॅफे कॉफी शॉपच्या उद्घाटनप्रसंगी येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांना मिळाल्याने त्यांनी नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी सागर भैय्यासाहेब अंगरखे राहणार,विद्यानगर शेवगाव हा खंडोबा मैदानावर दुसऱ्या डेव्हिंड कॅफे कॉफी शॉपच्या उद्घाटनाची तयारी करीत असताना त्याला पोलिस पथकाची चाहूल लागताच तो मोटारसायकल वरून पळून जात असताना त्याला शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून शेवगाव तहसीलदार कार्यालया समोर सापळा रचून शिताफीने रंगेहाथ पकडले.आणि त्याला ताब्यात घेऊन अटक करून दिनांक ८/८/२०२५ रोजी शेवगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावलेली आहे.शेवगाव शहरातील कोणत्याही व्यक्तींची फसवणूक अगर लुबाडणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलिस स्टेशनला बिनधास्तपणे संपर्कं साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब,पोलिस सब इन्स्पेक्टर रामहरी खेडकर,पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे,पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ,भगवान सानप,राजू बडे, भारत अंगरखे,दादासाहेब खेडकर,ईश्वर बेरड, रोहित पालवे,नकुल फलके,अहिल्यानगर दक्षिण सायबर सेलचे पोलिस काॅंन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून पुढील गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रामहरी खेडकर हे करीत आहेत.शेअर मार्केटने अनेकांना बोअर केले आहे.अजुनही बरेच मोठे मासे राजरोसपणे बाहेर फिरत आहेत त्यांच्या ही थोड्याच दिवसात मुसक्या आवळल्या जातील असे आश्वासन शेवगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी दिले आहे.