गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!
कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगावचा फेब्रुवारी/मार्च २०२५ बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत महाविद्यालयाचा निकाल ८८.१९ % लागला आहे.
फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये नाशिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत महाविद्यालयाचे एकूण ५४२ विद्यार्थी-विद्यार्थिनी परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते,त्यात विज्ञान शाखेतून २८३ पैकी २८३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत यश मिळवले तर,कला शाखेतून २५९ पैकी १९५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्तम गुण प्राप्त करत यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेतून प्रथमस्थान अश्विन भाऊसाहेब पाटील (८१:००%),द्वितीयस्थान दिशा दिलीप राजपूत (७८:८३%) तर नीरव सुधाकर पाटील (७८:३३%) तृतीयस्थान पटकावत यश प्राप्त केले आहे.
कला शाखेतून प्रथमस्थान योगिता प्रवीण बोरसे (८१:६७%),द्वितीयस्थान श्रुती नितीन पाटील (७६:५०%) तर तृतीयस्थान दुर्गा राजेंद्र भोई (७२:५०%) गुण प्राप्त करीत यश मिळवले आहे.
महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,दुध फेडरेशनच्या संचालिका तथा संस्थेच्या सचिव ताईसाहेब डॉ.पुनम पाटील,मंत्रालयातील उपसचिव दादासाहेब प्रशांतराव पाटील,प्राचार्य रविंद्र वळखंडे,माजी प्राचार्य अनिल पवार,परीक्षा केंद्रप्रमुख मनोजकुमार पवार,पर्यवेक्षिका सिमा शिसोदे, कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील आदिंनी आनंद व्यक्त करीत सर्व विद्यार्थी तथा त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.























