जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सोमेश विजय पाटील यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 (महाराष्ट्र राज्य ) प्रदान

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सोमेश विजय पाटील यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 (महाराष्ट्र राज्य ) प्रदान

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील श्री गो. से. हायस्कूलचे माजी कर्मचारी विजय पाटील यांचे सुपुत्र श्री.गो.से. हायस्कूल चे माजी विद्यार्थी सोमेश विजय पाटील यांना नुकताच संजीवनी फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) तर्फे राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 (महाराष्ट्र राज्य ) प्रदान करण्यात आला. संपूर्ण राज्यभागातून 51 जणांची निवड करण्यात आली होती, सोमेश विजय पाटील यांच्यासह बहीण,आई, वडील संपूर्ण परिवाराची उपस्थिती होती, दिनांक 03 मार्च 2024 रोजी संगमनेर येथील तारांकित हॉटेल मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट संगमनेर येथे दिमाखदार सोहळा पार पडला या सोहळ्यास माजी आमदार व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. डॉक्टर जयश्री ताई बाळासाहेब थोरात, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सोमेश विजय पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, सर्वप्रथम मराठमोळ्या संस्कृती प्रमाणे मंचावर सोमेश पाटील यांचे औक्षण केले गेले मानाची भगवी शाल स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन सोमेश पाटील यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या मागील कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले अध्यक्षस्थानी शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या मनोगत सांगितले की आपण सर्व आपापल्या स्तरातून सामाजिक सेवा करून खऱ्या खऱ्या अर्थाने तुमचा सन्मान करणे गरजेचे आहे, राज्यातील पुरस्कार त्यांच्या कार्याची गाथा प्रकाशित केल्यास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल या कार्याबद्दल माझा संपूर्ण सहभाग असेल असे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले. पुरस्कार सुरु होण्या अगोदर अनेक पुरस्काररार्थीनी आपले मते मांडली प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर सानप यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रसंचालक गोरक्ष भवर यांनी केले. यावेळी युवा नेते माजी आमदार अनेक नेते उपस्थित होते. सोमेश पाटील यांच्या व विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हा पुरस्कार माझा नसून माझ्या आई वडील यांचा आहे काम करत रहावे कुठलीही अपेक्षा न बाळगता मदत करण्यासाठी पैसाच हवा असं काही नाही आपल्या कौशल्याचा जोगावर आपण हवी ती मदत करून इतरांना वाचवू शकतो.
– सोमेश विजय पाटील.