आदित्य अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वालसावंगी शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

वालसावंगी (प्रतिनिधी महेंद्र बेराड) – आदित्य अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., भोकरदन शाखा वालसावंगीचा पहिला वर्धापन दिन दिनांक १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व लक्ष्मीपूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी चहापान व अल्पोपहाराचेही आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास वालसावंगी येथील बारी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर हिरालाल शेठ कोथळकर, श्रीकांतजी आखाडे, गोलू सेठ जैस्वाल, प्रकाशराव पवार, रमेश पाटील तराळ सरपंच पद्मावती, गणेश भुते, तसेच अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष महेंद्र बेराड सर, नानूदा बाबा (जयदेव वाडी), डॉ. सुनील रत्नपारखी, सुनील सेठ व अनिल सेठ जोडपे, मिठू सेठ कोथळकर, प्रकाश भुते, अंकुश दळवी, अनिल दुतोंडे (दानापूर), गजानन पायघन (माजी उपसरपंच, धामणगाव), प्रवीण भुते (धामणगाव) यांच्यासह परिसरातील खातेदार, कर्जदार, ठेवीदार, सभासद व स्थानिक संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सविता नंदकिशोर पायघन व नंदकिशोर पायघन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सभासदांचा विश्वास व सहकार्य हीच संस्थेची खरी ताकद असून भविष्यातही हा विश्वास अबाधित ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. संस्था अधिक बळकट होऊन सर्वसामान्यांना आर्थिक मदत करत उद्योगधंद्यांना चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप सर्व मान्यवरांचे आभार मानून करण्यात आला.
























